Saturday, April 26, 2025

Fact Check

Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे

Written By Komal Singh, Translated By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
May 10, 2024
banner_image

Claim
कलिंगड लाल आणि गोड करण्यासाठी इंजेक्शन टोचणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले.
Fact

नाही, व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे.

कलिंगड हे परंपरेने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करणारे हे फळ बाहेरून हिरवे आणि आतून लाल आणि गोड असते. कलिंगडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की, पोलिसांनी कलिंगड लाल आणि गोड बनवण्यासाठी इंजेक्शन टोचणाऱ्या व्यक्तीला पकडले.

सुमारे सात मिनिटांच्या व्हिडीओमध्ये तोंडाला रुमाल बांधलेला एक माणूस कलिंगड, लाल रंगाने भरलेली इंजेक्शन आणि केमिकलच्या कुपी घेऊन बसलेला दिसत आहे. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती स्वत:ला पोलिस असल्याचे सांगत असून हातात काठी घेऊन कलिंगडमध्ये इंजेक्शन टोचणाऱ्या व्यक्तीला फटकारताना दिसत आहे. यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल करून माफी मागितली. व्हिडीओमध्ये आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या सूचनेनुसार केमिकलपासून बनवलेला लाल रंग दाखवत आहे. येथे एक्स-पोस्ट आणि संग्रहण पाहता येईल.

Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे
Courtesy: X/@Modified_Hindu9

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे

Fact Check/ Verification

व्हायरल व्हिडिओची तपासणी करण्यासाठी, न्यूजचेकरने प्रथम व्हिडिओच्या मुख्य फ्रेमचा Google रिव्हर्स इमेज सर्च केला. दरम्यान, आम्हाला फेसबुक पोस्टमध्ये व्हिडिओची एक मोठी आवृत्ती मिळते, जिथे 29 सेकंदावरील अस्वीकरण व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचे सांगतो.

Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे

पुढील तपासात, आम्ही संबंधित कीवर्डद्वारे या व्हिडिओशी संबंधित माहिती शोधली. दरम्यान, हा व्हिडिओ 29 एप्रिल 2024 रोजी “सोशल मेसेज” नावाच्या फेसबुक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये आढळून आला आहे. येथेही 29 सेकंदांवर डिस्क्लेमरमध्ये व्हिडिओचे वर्णन स्क्रिप्टेड असे करण्यात आले असून हा व्हिडिओ जनजागृतीच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे.

Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे
Courtesy: fb/Social Message

पुढे तपासात, आम्ही “सोशल मेसेज” फेसबुक पेज शोधले. आम्ही पेजवर असे अनेक व्हिडिओ पाहिले. पेजच्या बायोमध्ये माहिती देण्यात आली आहे की या फेसबुक पेजवर पोस्ट केलेले काही व्हिडिओ स्क्रिप्टेड आहेत, जे जागरूकता आणि मनोरंजनाच्या उद्देशाने बनवले गेले आहेत. आम्हाला आढळले की कलिंगडात भेसळ विषयावरील अनेक व्हिडिओ अलीकडे पेजवर अपलोड केले गेले आहेत. या व्हिडिओंच्या स्क्रिप्टही सारख्याच आहेत आणि व्हायरल झालेल्या व्हिडीओचे कलाकारही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. त्यामुळे व्हायरल झालेला व्हिडिओही सोशल मेसेज पेजच्या कलाकारांनीच बनवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारचे इतर व्हिडिओ येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात.

Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे
Courtesy: fb/Social Message
Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे
Courtesy: fb/Social Message

पुढील तपासात हिरवे वाटाणे रंगवणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी “सोशल मेसेज” फेसबुक पेजवर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या धर्तीवर एक स्क्रिप्टेड व्हिडिओ सापडला. व्हायरल व्हिडीओप्रमाणे येथेही दोन कलाकार आहेत, ज्यापैकी एक आरोपी आहे आणि दुसरा पोलिस आहे. येथेही आरोपीच्या तोंडाला रुमाल बांधून तो व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या ठिकाणी बसून मटार रंगवत आहे. दोन्ही व्हिडिओंमध्ये समान बाटल्या आणि कॅन दिसत आहेत आणि खाली पांढरी चादर पसरलेली आहे. इथेही व्हायरल व्हिडीओमध्ये जसे पोलिस कर्मचारी आरोपीला दंडुका दाखवतात आणि प्रश्नांची उत्तरे देतात, तसेच प्रश्नही जवळपास सारखेच आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकारांचा आवाज सारखाच आहे. ज्यावरून हे स्पष्ट होते की दोन्ही स्क्रिप्टेड व्हिडिओ एकाच कलाकारांनी बनवले आहेत.

Fact Check: कलिंगडामध्ये इंजेक्शन टोचणाऱ्याला पोलिसांनी पकडले का? व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे
Courtesy: fb/Social Message

त्यानंतर आम्ही “सोशल मेसेज” पेजचा ऑपरेटर रॉकीशी फोनवर बोललो. फोनवरील संभाषणादरम्यान त्याने या स्क्रिप्टेड व्हिडिओचा दिग्दर्शक असल्याचे कबूल केले. हा व्हिडीओ बनवण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. अस्वीकरण काढून दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Conclusion

आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, कलिंगड लाल आणि गोड करण्यासाठी इंजेक्शन टोचणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले असे सांगणारा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे.

Result: Missing Context

Sources
Several posts by Facebook page- Social Message.
Phonic conversation with the director of scripted video.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,924

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.