Wednesday, April 23, 2025
मराठी

Fact Check

Russia-Ukraine conflict मध्ये ISKCON द्वारे मदतकार्याच्या नावाने व्हायरल झाले जुने फोटो

banner_image

Russia-Ukraine conflict मध्ये ISKCON द्वारे मदतकार्य केले जात असल्याच्या दाव्याने फोटो व्हायरल झाले आहेत.

Russia-Ukraine conflict

व्हायरल ट्विट इथे पहा.

रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे युक्रेनमधील मानवतावादी संकट अधिक गडद होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हजारो देशवासी युक्रेन सोडून शेजारच्या देशांमध्ये आश्रयासाठी सीमा ओलांडत आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये राहणाऱ्या लोकांना या संकटाच्या काळात मदत करण्याचे काम सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक संस्था आपापल्या स्तरावर करत आहेत. मात्र, युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे या प्रयत्नांना फारसे बळ मिळत नाहीये.

Russia-Ukraine conflict सोशल मीडियावर अनेक खोटे दावे व्हायरल झाले होते. Newschecker गेल्या काही दिवसांपासून वाचकांपर्यंत अचूक माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे. Russia-Ukraine conflict बद्दल न्यूजचेकरने केलेल्या भ्रामक दाव्यांची पडताळणी येथे पाहिली जाऊ शकते. अलीकडेच, युक्रेनमध्ये शीख समुदायाच्या पुढाकाराने गुरु का लंगर आयोजित करण्याच्या नावाखाली एक दिशाभूल करणारा फोटो शेअर केला गेला, त्याची आम्ही केलेली पडताळणी येथे पहाता येईल.

Russia-Ukraine conflict दरम्यान मदतकार्य केले जात असल्याच्या नावाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत.

Fact Check/Verification 

Russia-Ukraine conflict दरम्यान इस्कॉनने मदत कार्य केल्याच्या नावाने शेअर केलेले पहिला फोटो पडताळणीसाठी आम्ही ते Google शोध घेतलाले. या प्रक्रियेत आम्हाला आढळून आले की, व्हायरल फोटो इस्कॉनच्या अधिकृत वेबसाइटसह इतर अनेक वेबसाइट्सद्वारे प्रकाशित केले गेला आहे.

इस्कॉनच्या अधिकृत वेबसाईटवर हे चित्र चेचन्यातील मदतकार्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हे चित्र कधी काढण्यात आले आणि ते कोणत्या उद्देशाने काढण्यात आले याबाबत कोणतीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नाही. चेचन्या हे रशियाच्या दक्षिण भागात स्थित एक प्रजासत्ताक आहे, ज्यातील बहुतेक भाग रशियाच्या सीमेला लागून आहे आणि काही भाग जॉर्जियालगत देखील आहे.

इस्कॉनच्या अधिकृत वेबसाइटवर व्हायरल झालेल्या फोटोविषयी माहिती शेअर केली आहे

व्हायरल फोटो 3 ऑक्टोबर 2014 रोजी APPLIED SENTIENCE द्वारे प्रकाशित केलेल्या लेखात देखील आहे. याशिवाय, आम्हाला विकिपीडियावर प्रकाशित व्हायरल चित्र देखील मिळाले. वेबसाईटवर व्हायरल झालेल्या चित्राबाबत उपलब्ध माहितीनुसार, हे चित्र 21 फेब्रुवारी 2009 रोजी वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे.

Russia-Ukraine conflict मध्ये इस्कॉनच्या मदत कार्याच्या नावाखाली शेअर होत असलेला दुसरा फोटो पडताळीसाठी ही आम्ही गुगलचा आधार घेतला. या प्रक्रियेत, आम्हाला असे अनेक लेख आढळून आले जे सूचित करतात की, व्हायरल फोटो 2019 पासूनच इंटरनेटवर आहे.

गूगल सर्चचा परिणाम

iskcondesiretree नामक नावाच्या वेबसाइटने 3 जून 2019 रोजी प्रकाशित केलेल्या लेखात व्हायरल फोटो आहे. लेखात व्हायरल फोटोविषयी कोणतीही स्पष्ट माहिती शेअर केलेली नाही.

ISKCON Desire Tree माहितीचा एक अंश

व्हायरल झालेला फोटो Florida के Alachua स्थित Hare Krishna (ISKCON) Temple मधील आहे. Jivana Wilhoit नामक फोटोग्राफर ने हा फोटो काढला आहे.

Russia-Ukraine conflict पार्श्वभूमीवर इस्कॉनकडून मदत कार्य केले जात आहे

International Society for Krishna Consciousness द्वारे Russia-Ukraine conflict दरम्यान मदतकार्य सुरू आहे, त्यातील काही फोटो आणि व्हिडिओ इस्काॅन, पत्रकार Aditya Raj Kaul यांनी शेअर केले आहेत.

Conclusion

अशा प्रकारे आमच्या पडताळऑणीत स्पष्ट झाले की Russia-Ukraine conflict दरम्यान ISKCON द्वारे मदत कार्य सुरु असल्याच्या दाव्याने सोशल मीडियात व्हायरल झालेले फोटो जुने आहेत.

Result: False Context/False 

Source

Iskcon

Florida के Alachua स्थित Hare Krishna (ISKCON) Temple


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,862

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.