Wednesday, April 23, 2025
मराठी

Fact Check

फॅक्ट चेक: ‘महावाचन उत्सव’ चे असंख्य चुका असलेले व्हायरल प्रशस्तिपत्रक एडिटेड आहे

Written By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Jan 29, 2025
banner_image

Claim
‘महावाचन उत्सव’ चे असंख्य चुका असलेले प्रशस्तिपत्रक.
Fact

मूळ प्रशस्तिपत्रकात फेरफार करून दिशाभूल करण्यात येत आहे.

‘महावाचन उत्सव’ चे असंख्य चुका असलेले प्रशस्तिपत्रक असे सांगत एक प्रशस्तिपत्रक असलेला दावा चांगलाच व्हायरल झाला आहे. आम्हाला हा दावा X आणि Facebook वर मोठ्याप्रमाणात व्हायरल असल्याचे निदर्शनास आले.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

फॅक्ट चेक: 'महावाचन उत्सव' चे असंख्य चुका असलेले व्हायरल प्रशस्तिपत्रक एडिटेड आहे

“हे महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याचे प्रशस्ती पत्र वाचा, त्यातील मराठी वाचून भोवळ येईल.असे सरकार, असे मंत्री, असे शिक्षक, असे प्रशस्ती पत्रक देणारे असे विद्यार्थ्यांचे भवितव्य लाज आणणारे” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.

Fact Check/ Verification

आम्ही तपासाची सुरुवात करताना सर्वप्रथम व्हायरल प्रशस्तिपत्रकावरील मजकूर वाचला. असंख्य चुका आहेत असे दाव्यात सांगितल्याप्रमाणे आम्हाला त्यात व्याकरणाच्या दृष्टीने अनेक चुका दिसल्या. संबंधित प्रशस्तिपत्रकावर आम्हाला ” ‘महाराष्ट्र शासन’ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई ‘महावाचन उत्सव २०२४ ‘ प्रशस्तीपत्र महावाचन उत्सव सरस्वती माध्यमिक विद्यालय, ठाणे, इयत्ता 10 वी, महावचन उत्सव 2024 या महावचन इयत्ता 9 वी ते 12 वी या गतातून सहभाग घेतलयाबादल अपनास हे संरक्षण पत्र प्रदान केले जात आहे। आपका वाचनच्या आवेदन और सक्रिय सहभागी हा निगम यशस्वी झाला है। वाचनाचा यात्रा आपल्याला नव्या उंचीवर नून ठेवेल यात सादि नहीं। महावचन उत्सव सहभागी आपका अभिनंदन! आपलिया पुढिल वाचन यात्रासाथी हार्दिक शुभेच्छा! दीपक केसरकर मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र Camry एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र” असा मजकूर आढळला.

संबंधित प्रशस्तिपत्रकावर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला. दरम्यान समान दावा करणाऱ्या पोस्ट वगळता आम्हाला याबद्दल विशेष माहिती किंवा महाराष्ट्र सरकार आणि शिक्षण खात्याच्या कोणत्याही माध्यमावर चुका असलेले ते प्रशस्तिपत्रक सापडले नाही.

यामुळे संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून आम्ही शोध घेतला असता, आम्हाला दैनिक प्रभातने २७ सप्टेंबर २०२४ रोजी यासंदर्भात दिलेली बातमी आढळली. यामध्ये राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी सोशल मीडियावर होत असलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट करून खात्यातर्फे दिले जाणारे प्रशस्तिपत्रक अचूक असल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती आम्हाला मिळाली.

फॅक्ट चेक: 'महावाचन उत्सव' चे असंख्य चुका असलेले व्हायरल प्रशस्तिपत्रक एडिटेड आहे
Courtesy: Dainik Prabhat

आणखी शोध घेत असताना आम्हाला Maharashtra DGIPR या सरकारी पातळीवरील माहितीचे वितरण करणाऱ्या अधिकृत सरकारी यंत्रणेने याबद्दल २७ सप्टेंबर २०२४ रोजी केलेली फेसबुक पोस्ट मिळाली. यातही “शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात ‘महावाचन उत्सव २०२४’ राबविण्यात येत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशस्तीपत्र देण्यात येते. विभागाच्या https://mahavachanutsav.org या संकेतस्थळावर हे प्रशस्तीपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलेले आणि विभागाने उपलब्ध करून दिलेले हे प्रशस्तीपत्र अचूक असल्याची माहिती राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली आहे.” अशीच माहिती मिळाली.

फॅक्ट चेक: 'महावाचन उत्सव' चे असंख्य चुका असलेले व्हायरल प्रशस्तिपत्रक एडिटेड आहे
Courtesy: FB/Maharashtra DGIPR

दरम्यान मूळ प्रशस्तिपत्रक आणि व्हायरल प्रशस्तिपत्रक यात तुलना केली असता एडिटिंग तंत्राच्या आधारे फेरफार करून खोटा दावा केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

अधिक तपासासाठी राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांच्या कार्यालयाशी आम्ही संपर्क साधला, तेथे आम्हाला शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात ‘महावाचन उत्सव २०२४’ स्पर्धा घेतली जात असताना कुणीतरी हा खोडसाळपणा केला होता. मात्र खात्याचे प्रमाणपत्र अचूक असून अशाप्रकारच्या चुका खात्याने केलेल्या नाहीत. अशी माहिती देण्यात आली.

राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी या ‘महावाचन उत्सव २०२४’ स्पर्धेसंदर्भात आपल्या इंस्टाग्राम आणि लिंकेडीन खात्यावरून केलेल्या पोस्ट एकंदर उपक्रमाची माहिती देऊन जातात. ‘महावाचन उत्सव २०२४’ चे अधिकृत संकेतस्थळ येथे पाहता येईल.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात ‘महावाचन उत्सव’ चे असंख्य चुका असलेले प्रशस्तिपत्रक हा दावा मूळ प्रशस्तिपत्रकात फेरफार करून दिशाभूल करीत व्हायरल केला जात असल्याचे स्पष्ट झाले.

Result: Altered Media

Our Sources
News published by Dainik Prabhat on September 27, 2024
Facebook post by Maharashtra DGIPR on September 27, 2024
Conversation with office of Maharashtra State Project Director of State Council of Primary Education



कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,862

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.