Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

Monthly Archives: October, 2022

व्हायरल झालेला हा फोटो काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा नाही

दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी,आम्ही व्हायरल प्रतिमेचा Google रिव्हर्स शोध केला.आम्हाला एप्रिल २०१६ मध्ये ग्रीनबारेज रिपोर्टर नावाच्या वेबसाइटने प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला,ज्यामध्ये व्हायरल प्रतिमा उपस्थित आहे.या छायाचित्राचा स्रोत देण्यात आलेला नसला तरी,सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेले हे चित्र काही वर्षांपूर्वीपासून इंटरनेटवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अरविंद केजरीवाल यांचा धनुष्य-बाण उलटा धरलेला हा फोटो बनावट आहे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून,त्याद्वारे त्यांची खिल्ली उडवली जात आहे.चित्र दसरा कार्यक्रमासारखे दिसते,ज्यात केजरीवाल धनुष्यबाण उलटे धरलेले दिसत आहेत.केजरीवाल यांना धनुष्यबाण नीट कसा धरायचा हे देखील कळत नाही असा टोला मारत लोक लिहित आहेत.हा फोटो ट्विटर आणि फेसबुकवर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारत जोडो यात्रेनंतर लोकप्रियतेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना मात दिली का?ही पोस्ट दिशाभूल करणारी

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) ७ सप्टेंबरला सुरुवात होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे.काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत आहेत.हे पाहता भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची (Rahul Gandhi) लोकप्रियता पंतप्रधान मोदींपेक्षा (Narendra Modi) जास्त झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.आजतक वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणाच्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून हा दावा करण्यात आला आहे.

चित्रपट निर्मात्या किरण राव यांचे जुने छायाचित्र दिशाभूल करीत होत आहे व्हायरल

2015 मध्ये रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळ्यादरम्यान आयोजित केलेल्या चर्चेत इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका यांच्याशी संवाद साधताना अभिनेता आमिर खानने देशात भीती, असुरक्षितता आणि असहिष्णुतेचे वातावरण असल्याचे विधान केले. किरण आणि तो त्यांचे संपूर्ण आयुष्य भारतात जगत आहेत, पण पहिल्यांदाच आपण भारत सोडावा का? असे विचार मनात येत असल्याची प्रतिक्रिया आमिर खान याने दिली होती.

नामिबियातून भारतात आलेल्या चित्त्याने एका व्यक्तीवर हल्ला केला? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

17 सप्टेंबर 2022 रोजी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना केंद्रीभूत ठेऊन अनेक वाद वाढत चालले आहेत. सोशल मीडियावर नामिबियाच्या चित्त्यांच्या नावाने अनेक दावे शेअर केले जात आहेत. Newschecker द्वारे या दाव्यांची तपासणी येथे वाचली जाऊ शकते. नामिबियातील चित्ता म्हणून शेअर केलेल्या या व्हिडिओची तपासणी करण्यासाठी, आम्हाला त्याची एक की-फ्रेम Google वर सापडली. प्रक्रियेत, आम्हाला कळले की व्हायरल व्हिडिओ फेब्रुवारी 2021 पासून इंटरनेटवर उपस्थित आहे.

हिजाब आणि महसा अमिनीच्या मृत्यूचा निषेध करणाऱ्या टॉपलेस महिलेचा हा व्हिडिओ इराणमधील नाही

इराणमध्ये जवळपास महिनाभरापासून हिजाबविरोधी निदर्शने सुरू आहेत. बळजबरीने हिजाब घालण्याच्या विरोधात इराणी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, एका टॉपलेस महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता इराणमधील महिला टॉपलेस होऊन हिजाबला विरोध करत असल्याचा दावा या व्हिडिओसोबत करण्यात आला आहे.

गायक उदित नारायण यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा करणारी व्हायरल पोस्ट ही अफवा आहे

गायक उदित नारायण यांच्या निधनाच्या अफवेने इंटरनेटवर तुफान चर्चा केल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते आश्चर्यचकित झाले, ज्यामुळे ‘सेलिब्रेटी डेथ होक्स’ला बळी पडणारे एक नवे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली आहे .

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पाकिस्तानचा झेंडा? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या 3750 किमी लांबीच्या भारत जोडो यात्रेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही लोक झेंडा घेऊन पदयात्रा काढत आहेत. काँग्रेस पक्षावर निशाणा साधत अनेक सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांच्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read