Monday, March 8, 2021
Monday, March 8, 2021

सिद्धांतांची संहिता

  • तटस्थपणा आणि निष्पक्षतेची वचनबद्धता

Newschecker.in हे एक स्वतंत्र फॅक्ट चेकिंग व्यासपीठ आहे आणि आमचे कोणतेही फॅक्ट चेकर, परीक्षक, पत्रकार हे कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा वकिलांच्या गटाशी संबंधित नाहीत, त्यांची संपादकीय मते निष्पक्ष आणि पारदर्शक आहेत. आम्ही प्रत्येक पडताळणीसाठी समान प्रक्रियेचे अनुसरण करतो आणि पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढतो. आम्ही कोणत्याही प्रकरणात समर्थन करत नाही किंवा विशिष्ट धोरणात्मक भूमिका घेत नाही. आम्ही आमच्या कार्यपद्धतीच्या आधारे पडताळणी करतो.  या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी वेळोवेळी सुधारणा केली जाईल.

  • पारदर्शकता

Newschecker.in ने आपल्या लेखात दाव्याची सत्यता कशा प्रकारे उघड केली हे स्पष्टपणे आणि विस्ताराने मांडले आहे. आमची इच्छा आहे की, आमचे वाचक स्वतः शोधांचे सत्यापन करण्यास सक्षम असावेत. न्यूजचेकरच्या लेखांमध्ये सर्व स्त्रोतांची माहिती दिली जाते ( स्त्रोताच्या वैयक्तिक सुरक्षिततेशी तडजोड केली जाऊ शकते अशा प्रकरणांच्या अपवादाशिवाय). यामुळे मात्र वाचक याचे अवलोकन करु शकतात.  काही प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त तपशील देण्याचा आणि वेगवेगळ्या स्त्रोतांकडून तपशील गोळा करण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरुन वाचक प्रत्येक शोधाचे परीक्षण करु शकतील. 

  • निधी आणि संस्थेची पारदर्शकता

Newschecker.in  हा N C Media Network चा विशेषज्ञ टीमसह स्वतंत्र तथ्य पडताळणी उपक्रम आहे. एनसी मीडिया नेटवर्क ही तंत्रज्ञान-आधारित सामग्री सेवा क्षेत्रात काम करणारी एक स्वयं-अनुदानित संस्था आहे. एनसी मीडिया क्लायंटसोबत काम करत असताना न्यूजचेकरच्या ऑपरेशन्स आणि संपादकीय धोरणाविषयी क्लायंट्चे काही म्हणणे नसेल. न्यूजचेकरकडून भारतीय मीडिया नेटवर्कसाठी तथ्य पडताळणी सेवा देखील प्रदान केली जाते यासाठी काही मोबदला देखील प्राप्त होतो. Newschecker.in च्या संपादकीय कार्याबद्दल सोशल मीडिया नेटवर्कचे काही म्हणणे नाही.

  • कार्यपद्धतीची पारदर्शकता

खोट्या बातम्या किंवा दाव्यांच्या पडताळणीसाठी केलेल्या कार्यपद्धतीचे विवरण देण्यासाठी Newschecker.in कटीबद्ध आहे. प्रकाशनाची निवड करण्यापासून, आम्ही आमच्या वाचकांना दावा पाठवण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि आम्ही तथ्य पडताळणी कशी करतो हे समजून घेण्यासाठी त्यांना सर्व तपशील प्रदान करतो.  

  • पारदर्शक सुधारणा धोरण

आम्ही हे सत्य स्वीकारतो की सोशल मिडियाच्या या जगात बातम्या किंवा माहिती सतत बदलत राहतात, परिणामी, लेख सतत अद्यतनित केले जाणे आवश्यक असते. आमच्या बाजूने काही चूक झाल्यास आम्ही ते मान्य करण्यास आणि दुरुस्त करण्यास तत्पर आहोत. आमच्या वाचकांना लेखाची सुधारित आवृत्ती शक्य तितक्या लवकर सादर व्हावी यासाठी तत्पर आहोत. आणि पारदर्शकपणे आम्ही प्रक्रियेची पुनरावृत्ती करुन आपले निष्कर्ष सादर करतो.