Thursday, April 18, 2024
Thursday, April 18, 2024

Monthly Archives: November, 2022

दिल्ली-NCR मधील भूकंपाशी जोडून व्हायरल झाला कुत्र्याचा दीड वर्षाहून अधिक जुना व्हिडिओ

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाच्या बातम्या येत असताना,सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.व्हिडिओच्या सुरुवातीला गेटला बांधलेला कुत्रा झोपलेला दिसत आहे.पण काही सेकंदांनंतर अचानक गेट हलू लागते आणि कुत्रा उठून उभा राहतो.

मोरबीमध्ये मदतकार्यासाठी नदीत उतरलेली ही व्यक्ती काँग्रेस आमदार नाही

गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्यूबच्या मदतीने पाण्यात तरंगताना दिसत आहे.ही व्यक्ती मोरबी येथील काँग्रेस आमदार ब्रिजेश मेरजा असल्याचा आणि अपघातानंतर गुडघाभर पाण्यात पोहून मदतकार्य करण्याची नौटंकी करीत असल्याचा दावा केला जात आहे.

ती 14 वर्षीय चित्रा मोठी होऊन सुधा मूर्ती झाली? व्हायरल दाव्यामागील सत्य हे आहे

इन्फोसिसच्या चेअरपर्सन सुधा मूर्ती यांची जीवनकथा असल्याचा दावा करणारा एक व्हायरल फॉरवर्ड मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.असा दावा करण्यात आला आहे की श्रीमती उषा भट्टाचार्य नावाच्या एका अनोळखी व्यक्तीने मुंबई ते बेंगळूर प्रवास करताना चित्रा नावाच्या घरातून पळून गेलेल्या मुलीच्या रेल्वे तिकिटाचे पैसे दिले आणि त्या मुलीला एका एनजीओकडे सोपविले.जेणेकरून तिची योग्य काळजी घेतली जाईल.पुढे असे म्हटले आहे की ही लहान मुलगी इन्फोसिसच्या चेअरपर्सन सुधा मूर्ती अर्थात इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची पत्नी बनली आहे.

गुजरातचे मंत्री राघवजी पटेल यांचा फोटो मोरबी पुलाचा ठेकेदार म्हणून होत आहे व्हायरल

गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींसोबत उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मोरबी पूल बांधण्याचे कंत्राट याच व्यक्तीला देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.या दाव्याने हे छायाचित्र ट्विटर आणि फेसबुकवर प्रचंड व्हायरल होत आहे.

कॅडबरी उत्पादनांमध्ये बीफ? खोटा दावा पुनरुज्जीवित करीत झाला व्हायरल

चॉकलेट उत्पादनातील दिग्गज कॅडबरीच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये असे लिहिले आहे की,''कृपया लक्षात ठेवा,आमच्या उत्पादनातील घटकांमध्ये वापरलेले जिलेटिन हे हलाल प्रमाणित आहे आणि ते उत्तम गोमांसापासून तयार केलेले आहे.”स्क्रीनशॉट शेअर करणारे वापरकर्ते दावा करतात की कॅडबरी भारतातील हिंदूंना त्यांच्या उत्पादनांद्वारे त्यांच्या नकळत गोमांस खायला लावत आहे.न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read