Saturday, April 27, 2024
Saturday, April 27, 2024

Monthly Archives: December, 2022

रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या टीसीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला का? येथे वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

सोशल मीडियावर एका रेल्वे स्टेशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन लोक उभे राहून एकमेकांशी बोलत आहेत, तेव्हा अचानक वरून काहीतरी पडताना दिसते आणि एका व्यक्तीच्या शरीरातून ठिणग्या बाहेर पडू लागतात. हा व्हिडिओ खरगपूर रेल्वे स्टेशन म्हणून शेअर केला जात आहे ज्यात दावा केला जात आहे की त्यात दिसत असलेल्या टीसीचा विजेची तार पडल्याने मृत्यू झाला आहे. झी न्यूज यूपी व्यतिरिक्त, हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सनी टीसीच्या मृत्यूचा दावा करत शेअर केला आहे.

१ जानेवारीपासून आरबीआय २००० च्या नोटा बंद करणार? खोटा आहे हा मेसेज

रिझर्व्ह बँक १ जानेवारीला २००० रुपयांच्या नोटा बंद करेल आणि त्याच दिवशी १००० रुपयांच्या नोटा जारी करेल, असा दावा करणारा एक मेसेज सध्या व्हॉट्सअपवर फिरत आहे.

अभिनेता शाहरुखच्या पाक क्रिकेट संघावरील वक्तव्याची जुनी व्हिडिओ क्लिप दिशाभूल करीत झाली व्हायरल

चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट पुढील महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्याआधी, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुखचे पाकिस्तान प्रेमी म्हणून वर्णन केले जात आहे आणि त्याच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख म्हणतोय, 'मी सुद्धा पठाण आहे आणि जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा मला वाटते की माझे वडील जिंकले आहेत.'

पंतप्रधान मोदींनी प्रत्येक नागरिकाला 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली नाही, दिशाभूल करणारी पोस्ट व्हायरल

पंतप्रधान मोदींचा एक फेसबुक लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते संसदेत भाषण करताना दिसत आहेत. पीएम मोदींनी प्रत्येक नागरिकाला 10 लाख रुपये देण्याची घोषणा केल्याचा धक्कादायक दावा व्हिडिओद्वारे केला जात आहे.

Weekly Wrap: नोटेवर शिवरायांचा फोटो, फ्रीजमधील वस्तूंनी कँसर आणि मोदींनी शिंदेंना ढकलले तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

भारत सरकारने छत्रपती शिवरायांचा फोटो २०० रुपयांच्या नोटेवर छापण्याचा निर्णय घेतला आहे. असा दावा या आठवड्यात करण्यात आला. फ्रीजमध्ये साठवून ठेवलेल्या वस्तू खाल्ल्याने महिलांना कँसर होत असल्याचा दावा व्हायरल करण्यात आला. नागपूर येथे एका कार्यक्रमात फोटोच्या आडवे आले म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ढकलले असा दावा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल करण्यात आला होता. हाताच्या काही कसरती केल्यास निरोगी राहता येते किंवा मुस्लिमांनी न्यायालयातच मान्य केले की अन्नात थुंकणे म्हणजे हलाल. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

200 रुपयांच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र छापणार का? येथे वाचा सत्य

भारत सरकारने 200 रुपयांच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे.

फ्रीज मध्ये ठेवलेल्या वस्तूंनी महिलांना कँसर होतो? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे

फ्रीज अर्थात रेफ्रिजरेटर हा आजकाल प्रत्येक घरातील महत्वाची गोष्ट बनला आहे. अन्नपदार्थ, फळे आणि भाज्या साठविण्यासाठी या फ्रीज चा वापर होतो मात्र, सध्या या फ्रीज बदल एक वेगळाच समज पसरविणारा दावा केला जात आहे. फ्रीज मध्ये साठविलेल्या वस्तू अतिशय घातक ठरू शकतात. फ्रीज मध्येच कँसर चे विषाणू तयार होतात. यामुळे कँसर होऊ शकतो आणि विशेषतः महिलांना याचा धोका जास्त असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे.

पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपूर्ण व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नागपुरात वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. आता याच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पीएम मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. एकनाथ शिंदे कॅमेऱ्यासमोर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मागे ढकलल्याचा दावा करीत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

‘वयाच्या 84 व्या वर्षी सुमन कल्याणपूर गाताना’ चा व्हायरल व्हिडिओ खोटा आहे

एका वृद्ध महिलेच गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर वयाच्या 84 व्या वर्षी गात असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये एका वृद्ध गृहस्थासोबत एक वृद्ध महिला युगलगीत गाताना दिसत आहे. 1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पतिता' चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायिलेले गाणे या व्हिडिओमध्ये आहे.

निरोगी राहण्यासाठी हाताच्या व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखविणारी व्यक्ती बत्रा हॉस्पिटलमधील डॉक्टर बजाज नाही

बत्रा हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे माजी प्रमुख ‘डॉ बजाज’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. हाताच्या व्यायामाचा एक संच प्रदर्शित करून जो कथितपणे एखाद्याला फिट आणि निरोगी राहण्यास मदत करेल, असा दावा करण्यात आला आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read