Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: January, 2023

रणबीर कपूरने फॅनचा फोन फेकला? व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या

रणबीर कपूरने सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोन फेकून दिल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून केला जात आहे.

Weekly Wrap: अंबानी कुटुंबाने पाहिला पठाण, राहुल गांधींनी घेतली बीबीसीच्या निर्मात्याची भेट, लाडली ची खासगी लग्नासाठी मदत योजना तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्ट चेक

पठाण चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादाने आणि त्यासंदर्भातील विविध पोस्टनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अंबानी कुटुंबीयांनी अभिनेता शाहरुख खान सोबत पठाण चित्रपट पाहिला असा दावा करण्यात आला. बीबीसी वाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित वादग्रस्त डॉक्युमेंटरी प्रसारित केल्याच्या पार्श्वभूमीवर या डॉक्युमेंटरीच्या निर्मात्याची भेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात घेतल्याचा दावा करण्यात आला. भारताचे आर्थिक स्थैर्य चांगले झाल्यामुळेच आम्हाला जी २० परिषदेचे यजमानपद मिळाले असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. लाडली फौंडेशन मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करते हा दावा असो किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅकर्स व्हिडीओ पाठवून लुटू शकतात हा दावा असो. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी यूकेमध्ये बीबीसीच्या पीएम मोदी डॉक्युमेंटरीच्या निर्मात्याची भेट घेतली होती का? व्हायरल इमेजमागील सत्य हे आहे

अनेक सोशल मीडिया युजर्स एक फोटो प्रसारित करत आहेत, जो आम्हाला आमच्या व्हॉट्सअ‍ॅप टिपलाइनवरही प्राप्त झाला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अलीकडील वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंटरीमागे “काँग्रेसचे षडयंत्र” असल्याचा दावा केला जात आहे, तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या माहितीपटाच्या निर्मात्याची भेट घेतली होती. गेल्या वर्षी यूकेमध्ये ही भेट झाली होती. असे दावा करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

अंबानी कुटुंबाने शाहरुख खानसोबत ‘पठाण’ पाहिला? सात वर्षे जुना आहे हा फोटो

गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडलेला शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाला. काही चित्रपटगृहांबाहेर चित्रपटाच्या विरोधात निदर्शने झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख खान मुकेश अंबानीच्या कुटुंबासोबत सेल्फी घेताना दिसत आहे. अंबानी कुटुंबाने शाहरुख खानसोबत 'पठाण' चित्रपट पाहिल्याचा दावा करत हा फोटो शेअर केला जात आहे.

G20 भारतात होण्याचे कारण ‘वाढती अर्थव्यवस्था’ आहे? जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांच्या दाव्यामागील सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 19 जानेवारी रोजी मुंबई येथे मेट्रो लाइन 2A आणि 7 सोबत अनेक प्रकल्पांच्या उदघाटन सोहळ्यात भाग घेतला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असल्यामुळे भारताला G20 चे आयोजन करण्याची संधी मिळाली.

व्हिडीओ पाठवून मोबाईल आणि क्रेडिट डेबिट कार्ड हॅक करतात? खोटा आहे तो मेसेज

"अमित शाह यांनी मोदींना नाकारले" अशा नावाचा एक व्हिडीओ तुम्हाला येईल. तो व्हिडीओ व्हायरस आहे. त्या व्हिडीओमुळे तुमचा मोबाईल हॅक होईल. असे सांगणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाठविणारे क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅकर्स असल्याचे, हा मेसेज सांगतो. त्यामुळे अनेकजण हा मेसेज आपल्या ग्रुप्स मध्ये व्हायरल करीत आहेत. व्हाट्सअप वर सध्या या मेसेजची जोरदार चलती आहे.

लाडली फाउंडेशन खाजगी वैयक्तिक विवाहांना आर्थिक सहाय्य देत नाही

भारतात लग्न हे एक महाग प्रकरण आहे. अनेक गरीब कुटुंबे आपल्या मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होतात कारण त्यात हुंडा, विवाह समारंभ आणि आहेर आदी आव्हाने पार पाडायची असतात. सध्या याचसंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे आणि तो पालकांच्या डोक्यावरून मुलीच्या लग्नाचे ओझे कमी करण्याचे आश्वासन देत आहे. मेसेजमध्ये एका संस्थेची माहिती आहे जी गरीब कुटुंबांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी संपूर्ण खर्च देते आणि एक लाख रुपयांचे घरगुती साहित्य भेट स्वरूपात देते. अनेक लोक हा संदेश पसरवण्यासाठी आणि गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी ती पोस्ट शेअर करत आहेत. लाडली फौंडेशन ही मदत करीत असून हा संदेश सर्वांना पाठवा असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावे या मेसेजच्या शेवटी करण्यात येत आहे.

केरळ मध्ये हिंदू मुलींनी मुस्लिमाला मारले? चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल होतोय व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुली आणि महिलांचा समूह एक ते दोन व्यक्तींना मारताना दिसतात. या व्हिडीओ सोबत अर्धी इंग्रजी आणि अर्धी हिंदी कॅप्शनही शेयर केली जात आहे. "In Kerala Hindu girls attacked a Muslim man for his misbehaviour ऐसा ही जिहादी👌👍💪🇮🇳🚩 लोगों को सबक सिखाओ." "केरळ मध्ये हिंदू मुलींनी मुस्लिमावर त्याच्या गैरवर्तनामुळे हल्ला केला. असा ही जिहादी. या लोकांना धडा शिकवा." असे ही कॅप्शन सांगते.

ईडी धाडीनंतर नाना पाटेकरांनी केली हसन मुश्रिफांची पाठराखण? खोटा आहे हा दावा

महाराष्ट्रातील प्रभावी राजकारणी, राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी ने छापे टाकले. हे छापे टाकल्यानंतर स्वतः हसन मुश्रीफ आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी आरोप केले. काहींनी त्यांचे समर्थन केले तर सत्ताधाऱ्यांनी विरोधही केला. हा राजकीय कलगीतुरा रंगलेला असतानाच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी ईडी धाडीनंतर हसन मुश्रीफ यांची पाठराखण केली. असा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

पतंगाच्या दोरीत अडकून उडालेल्या मुलीचा व्हिडीओ भारतातील नाही

पतंगाच्या दोरीत अडकून उंच उडालेल्या आणि सुदैवाने बचावलेल्या मुलीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना भारतात घडल्याचे सांगून युजर्स हा व्हिडीओ शेयर करीत आहेत. एक लहान मुलगी पतंगासोबत उडून गेली. अशा कॅप्शनखाली हा व्हिडीओ शेयर होतोय. मकर संक्रांतीच्या अनुषंगाने सर्वत्र पतंग महोत्सव होत असतात. याचाच आधार घेऊन हा दावा केला जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read