Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

Monthly Archives: January, 2023

इंडोनेशियातील नुकत्याच झालेल्या भूकंपाचा सांगत व्हायरल व्हिडिओ हा तैवानचा आहे

मंगळवारी इंडोनेशियाला खोल-समुद्र-भूकंपाचा धक्का बसल्यानंतर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी द्वीपसमूहातील थरथराचे परिणाम दर्शविणारे व्हिज्युअल शेअर केले. ऑनलाइन शेअर केल्या जाणाऱ्या अनेक व्हिडिओंपैकी, व्हिज्युअलचा एक संच, कथितपणे एका जंगलातील, जिथे लोकांचा एक गट हादरे बसत असताना आणि खाली पडताना दिसत आहे, व्हायरल झाला आहे. ज्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे त्यांनी असा दावा केला आहे की त्यात अलीकडील इंडोनेशियातील भूकंपाचे धक्के उत्तर ऑस्ट्रेलियापर्यंत जाणवले होते. न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले.

Weekly Wrap: काश्मीर फाईल्सला ऑस्कर, शाळांना २० दिवस सुट्टी, तर नोटा बाद ठरतील तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवडा अनेक खोट्या दाव्यान्नी गाजला. १५ जानेवारी पासून कोरोनामुळे शाळा कॉलेजने सुट्टी दिली जाणार असा एक दावा व्हायरल झाला. भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी मांसाहार आणि मद्यावर यथेच्छ ताव मारत आहेत असे सांगणारा एक फोटो व्हायरल करण्यात आला होता. ख्रिश्चनांवर हल्ले केल्यास १० वर्षे शिक्षा होईल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे किंवा चलनी नोटेवर काहीही लिहिल्यास ती नोट अवैध ठरविली जाते असे दावे व्हायरल झाले. विवेक अग्निहोत्रींच्या दी काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे ऑस्कर साठी नामांकन झाल्याचा दावाही मोठ्याप्रमाणात पसरविण्यात येत आहे. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

एक दाबल्यावर फोन हॅक करणाऱ्या कॉल बद्दलचा मेसेज आलाय? घाबरू नका, खोटा आहे तो मेसेज

सध्या व्हाट्सअप वर एक इंग्रजी मेसेज जोरदार पसरत आहे. तुम्ही लसीकरण करून घेतले आहे का? असे विचारणारा एक संदेश येईल. १ दाबण्यास सांगितले जाईल आणि ते दाबल्यास फोन हँग होऊन हॅक होईल. आताच माझ्या मित्राचे असे झाले आहे. असे तो मेसेज सांगतो. लवकरात लवकर हा संदेश इतर ग्रुप्सवर टाका आणि इतरांनाही सावधान करा. असे सांगितले गेल्याने अनेकजण हा मेसेज पुढे पाठवत आहेत.

नोटेवर लिहिलं तर ती अवैध ठरते का? जाणून घ्या सत्य काय आहे

अनेकांना नोटेवर लिहायची सवय असते. अशा व्यक्तींना सतावणारा एक संदेश सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरतोय. आपण नोटेवर लिहिण्याची सवय सोडा. कारण असे केल्यास ती नोट अवैध ठरते असे हा मेसेज सांगतोय. व्हाट्सअप वर हा मेसेज जोरदार फिरू लागला आहे.

विवेक अग्निहोत्रीची काश्मीर फाईल्स ऑस्करसाठी ‘शॉर्टलिस्ट’ की ‘नामांकित’? येथे सत्य जाणून घ्या

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' ने मार्च 2022 मध्ये रिलीज झाल्यानंतर ऑनलाइन वर पुरेशी खळबळ उडवून दिली होती. आता अग्निहोत्रीच्या ट्विटनंतर "@TheAcademy च्या पहिल्या यादीत #Oscars2023 साठी शॉर्टलिस्ट" करण्यात आल्याचा दावा करून हा चित्रपट पुन्हा सोशल मीडियाच्या चर्चेत आला आहे. हे ट्विट आणि त्याबद्दलच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. 1990 मध्ये काश्मिरी पंडित समुदायाच्या निर्गमनावर आधारित चित्रपटाबद्दल त्या ट्विट चा आधार घेऊन बातम्या देण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्या पुढे सरसावल्या आहेत. न्यूजचेकरला हा दावा दिशाभूल करणारा वाटला कारण 95 व्या अकादमी पुरस्कारासाठी फक्त चार भारतीय चित्रपट निवडले गेले आहेत आणि काश्मीर फाइल्स त्यामध्ये नाही.

राहुल गांधी मांसाहार आणि दारू सेवन करताना दाखवणारा हा फोटो बनावट आहे

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणा येथून पंजाबपर्यंत जात आहे. दरम्यान, खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते कुठेतरी बसून खाताना दिसत आहेत. डायनिंग टेबलवर ड्रायफ्रुट्स, मांसाहारी पदार्थ आणि दारूसारखा दिसणारा पेयाचा ग्लासही ठेवलेला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.

‘ख्रिश्चनांवर हल्ला केल्यास दहा वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल’ असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही.

धर्माच्या नावावर कोणी ख्रिश्चनांचा छळ किंवा हल्ला केल्यास दहा वर्षांची शिक्षा होणार. असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. असे सांगणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ख्रिसमस सणाच्या काळात आणि त्यानंतर यासंदर्भात अनेक पोस्ट व्हायरल झाल्या असून त्यापैकी हा मेसेज अनेक युजर्स फॉरवर्ड करू लागले आहेत.

१५ जानेवारीपासून २० दिवस शाळा, कॉलेज बंद? दिशाभूल करीत मेसेज होतोय व्हायरल

चीन आणि इतर देशातील कोरोना वाढीच्या बातम्या पसरत असतानाच आपल्या देशातही लॉक डाऊन सारखी परिस्थिती येणार असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठविल्या जात असलेल्या या मेसेज मधून १५ जानेवारी पासून शाळा व कॉलेजीस २० दिवस बंद ठेवली जाणार असा दावा केला जात आहे.

Weekly Wrap: मोदींनी केले मुंडन, महाराष्ट्र राहणार अंधारात, थंडीने गंभीर आजार तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्ट चेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांच्या नावे भलत्याच महिलांचा फोटो घालून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. आईच्या निधनांनंतर हिंदू रीती रिवाज पळत नरेंद्र मोदींनी मुंडन करून घेतल्याचा दावा करण्यात आला होता. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ७२ तास वीज नसेल असा एक दावा करण्यात आला. थंडीच्या लाटेचा धोका असून अनेक गंभीर आजार होऊ शकतात हा दावा करण्यात आला. कांद्याची चटणी खाल्ल्याने जुनाट खोकला बारा होऊ शकतो. असा दावा करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

संपूर्ण महाराष्ट्राला शीतलहरींचा धोका? दिशाभूल करणारा आहे हा मेसेज

उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे. रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे. याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे, शरीर लुळे पडणे, पक्षाघात, ब्रेनहॅमरेज , रक्तवाहिन्या गोठणे , हार्टअटॅक , मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. असे सांगणारा एक मेसेज सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हाट्सअप वरून या मेसेज चे प्रसारण होत असून काळजी घेण्याची सूचना केली जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read