Sunday, November 24, 2024
Sunday, November 24, 2024

Monthly Archives: September, 2023

Weekly Wrap: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण, सांप्रदायिक विषय आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्टचेक

सोशल मीडियावर मागील आठवड्यातही फेक क्लेम्सचा पाऊस पडला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण, सांप्रदायिक विषय यावर विविध दावे करण्यात आले. कॅनडाच्या राजदूताने परत जाण्यापूर्वी दरबार साहिब येथे नमन केले, असा दावा करण्यात आला. कर्नाटकात घराजवळ न थांबवल्याने मुस्लिम जमावाने बस फोडली, असा दावा झाला. पोलिस आणि मीडियाच्या छळामुळे पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरने नदीत उडी मारून आत्महत्या केली, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेशात आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी मारहाण केली, असा दावा झाला. भाजपला सत्तेतून काढून टाकणे हीच सोनिया गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी केल्याचा दावा झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक आपणास या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आत्महत्या केली का? येथे सत्य वाचा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, “पोलिस आणि मीडियाच्या छळामुळे सीमा हैदरने नदीत उडी मारून आत्महत्या केली”.

Fact Check: मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधींबद्दल हे विधान केले नाही, एडिटेड स्क्रीनशॉट दिशाभूल करीत व्हायरल

सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून असा दावा केला जात आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, 2024 मध्ये भाजपला सत्तेतून काढून टाकणे हीच सोनिया गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल.

Fact Check: कर्नाटकात घराजवळ न थांबवल्याने मुस्लिम जमावाने बस फोडली, काय आहे सत्य?

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांनी पाच मतदानपूर्व हमी लागू केल्या होत्या. त्यापैकी एक शक्ती योजना आहे, जी महिलांना मोफत बस प्रवास देते. शक्ती योजना लागू होताच सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि दावे फिरवले गेले. असाच आणखी एक दावा समोर आला आहे.

Fact Check: कॅनडाच्या राजदूताने परत जाण्यापूर्वी दरबार साहिब येथे केले नमन?

कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते मुलाखत देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, पत्रकार मॅके यांना खलिस्तानी संघटनांबद्दल कॅनडाच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारतात. प्रश्नाच्या उत्तरात मॅके यांनी उत्तर दिले की "कॅनडामध्ये ते सर्व धर्माच्या लोकांवर प्रेम करतात. कॅनडामध्ये सर्व धर्मांचे स्वागत आहे."

Weekly Wrap: भारत-कॅनडा राजकीय वाद ते सांप्रदायिक रंग देणाऱ्या दाव्यापर्यंत प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर झालेल्या खोट्या दाव्यान्नी धुमाकूळ घातला. भारत आणि कॅनडा या देशांमध्ये सुरु असलेल्या राजकीय संघर्षात कॅनडाने भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी ट्रॅव्हल अडव्हायजरी लागू केली तसेच आरएसएस या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी घातली. असे दावे करण्यात आले. तामिळनाडू येथील पारंपारिक मूर्तिकारांवर तेथील सरकार अन्याय करत आहे, असा दावा करण्यात आला. भारतातील हिंदू विद्यार्थ्यांनी हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीवर अत्याचार केला असे सांगणारा एक दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: इंडोनेशियातील विद्यार्थिनीशी झालेल्या क्रूरतेचा जुना व्हिडिओ भारतातील असल्याचा सांप्रदायिक दावा करून व्हायरल

हिंदू विद्यार्थ्यांनी हिजाब घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून केला जात आहे.

Fact Check: कॅनडामध्ये आरएसएस वर घातली बंदी? खोटा आहे हा दावा

नुकत्याच झालेल्या भारत-कॅनडा राजकीय वादा दरम्यान सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे. व्हायरल दावा असा आहे की "कॅनडा सरकारने हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वर बंदी घातली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्वरित देश सोडण्याचे आदेश दिले आहेत".

भारतात प्रवास करताना ‘उच्च प्रमाणात सावधगिरी बाळगण्याची’ कॅनडाने जारी केली ट्रॅव्हल अडव्हायजरी: ANI चा दावा, कॅनडाच्या दूतावासाचा ‘बातम्यांना’ इन्कार

कॅनेडियन नागरिक आणि खलिस्तानी सहानुभूतीदार हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताची भूमिका असल्याच्या 'आरोपा'चा संदर्भ देत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे विधान एका मोठ्या वादाला तोंड फोडत आहे आणि नवी दिल्ली-टोरंटो संबंधांवर अधिक ताण पडण्याची परिस्थिती निर्माण करत आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read