Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: December, 2023

Weekly Wrap: राम मंदिरच्या मजूरांसोबत मोदींचे भोजन ते महात्मा गांधींना ब्रिटीशांचा भत्ता पर्यंत आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

सोशल मीडियावरील अनेक बनावट दाव्यांनी मागील आठवडा गाजला. पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले, असा दावा करण्यात आला. ब्रिटिश सरकारकडून महात्मा गांधींना दरमहा 100 रुपये भत्ता मिळत असे, असा दावा करण्यात आला. 31 मार्च 2024 नंतर 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या जातील असा दावा झाला. हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केल्याचा दावा करणारा व्हिडिओ एडिटेड

अनेक सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांनी विमानतळावर विरोध करीत त्याच्यासमोर घोषणाबाजी केल्याचा दावा केला आहे. “लोक हार्दिक पांड्यासमोर ‘मुंबई चा राजा रोहित शर्मा’ असे ओरडत आहेत. हार्दिक पांड्याच्या समोर रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केल्याचा दावा अनेक प्लॅटफॉर्म्सवर अनेक भाषांमध्ये व्हायरल झाला आहे.

31 मार्च 2024 नंतर जुन्या सिरीजमधील ₹100 च्या नोटा बंद होतील का? जाणून घ्या या व्हायरल दाव्याचे सत्य

31 मार्च 2024 नंतर 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या जातील असा दावा सोशल मीडिया युजर्स करत आहेत.

Fact Check: ब्रिटिश सरकारकडून महात्मा गांधींना हा भत्ता वैयक्तिकरित्या मिळाला होता? जाणून घ्या सत्य काय आहे

नॅशनल अर्काइव्हजकडून मिळालेल्या एका दस्तऐवजात असे ठामपणे समजले आहे की, महात्मा गांधींना ब्रिटीश सरकारकडून 100 रुपये मासिक भत्ता मिळत होता. असे सांगणारी एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. मराठी भाषेतील ही पोस्ट सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात फिरत आहे.

Fact Check: पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले?

पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांसोबत भोजन केले, असा दावा सोशल मीडियावर एक छायाचित्राच्या माध्यमातून केला जात आहे.

Weekly Wrap: अयोध्येच्या राम मंदिरापासून कोरोनाच्या व्हेरियंट पर्यंत आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

सोशल मीडियावर गेल्या आठवड्यातही व्हायरल फेक क्लेम्सची जोरात चर्चा झाली. बेळगावात महिलेची नग्न परेड प्रकरणी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करेतोवर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा करण्यात आला. अयोध्येतील राममूर्ती निर्मितीचे काम मुस्लिम कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे, हा दावा करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतःला शिंपी म्हणवतात, असा दावा करण्यात आला. संपूर्ण भारतातील प्रकरणांमध्ये अलीकडे वाढ झाली असताना नवीन कोरोनाव्हायरस प्रकाराबद्दल नागरिकांना सावध करणारी अडव्हायजरी असे सांगत एक दावा व्हायरल करण्यात आला. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा असल्याचे सांगून एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येणार आहेत.

Fact Check: अयोध्येतील राम मंदिर असा दावा करत व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे?

हा व्हिडीओ अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा आहे असा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रंगीबेरंगी लाइटिंग लावलेल्या मंदिराला अयोध्या येथील राम मंदिर असे संबोधले जात आहे.

कोविड प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर XBB व्हेरिएंट बद्दलची जुनी अडव्हायजरी व्हॉट्सअपवर व्हायरल

अलीकडेच सिंगापूर, अमेरिका आणि चीनमध्ये पसरल्यानंतर देशात JN.1 या नवीन प्रकाराचा शोध लागल्याने भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोविड संदर्भात खबरदारीचे आवाहन केले आहे. JN.1 प्रकार चिंतेचे कारण आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नसले तरी, भारतात एका आठवड्यात देशभरात सुमारे 252 नवीन संसर्गाची नोंद झाली आहे.संक्रमणाच्या वाढीदरम्यान, व्हॉट्सअपवर एक सल्ला देणारा मेसेज व्हायरल झाला आहे

Fact Check: राहुल गांधी स्वतःला शिंपी म्हणवून घेत असल्याचा दिशाभूल करणारा दावा करणारा हा व्हिडिओ अपूर्ण आहे

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “राहुल गांधी यांनी भाषण देताना स्वतःला शिंपी म्हणून वर्णन केले” असा दावा करून व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Fact Check: अयोध्येतील राममूर्ती निर्मितीचे काम मुस्लिम कुटुंबीयांकडे? जाणून घ्या सत्य काय आहे

अयोध्येतील राममूर्ती निर्मितीचे काम मुस्लिम कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे. असा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. १५२७-१५२८ दरम्यान परकीय आक्रमक बाबरने अयोध्येतील रामजन्मभूमीवरील राम मंदिर पाडून मशिद उभारण्याचे आदेश दिले होते.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read