Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
AI/Deepfake
बैलाच्या हल्ल्यातून मुलाला वाचवणाऱ्या गायीचा व्हिडिओ.
हा व्हिडीओ AI जनरेटेड आहे.
बैलाच्या हल्ल्यातून मुलाला वाचवणाऱ्या गायीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक बैल अचानक गायीजवळ बसलेल्या मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्या क्षणी तिथेच असलेली गाय त्या मुलाचे संरक्षण करत त्याच्या समोर उभी राहते आणि त्याला वाचवते. याचदरम्यान, एक व्यक्ती धावत येतो आणि त्या मुलाला सुरक्षितपणे मागे ओढून नेताना दिसतो. अनेक सोशल मीडिया युजर्स हा व्हिडिओ खऱ्या घटनेचा असल्याचा दावा करत शेअर करत आहेत.
एक्स पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “खरंच, प्राण्यांची निष्ठा बघा. जर निष्ठा शिकायची असेल, तर या मुक प्राण्यांकडून शिका. पाहा, गाईला गोमाता का म्हणतात — कारण आईच आपल्या लेकरासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत लढते.” या पोस्टचा आर्काइव्ह लिंक येथे पाहू शकता. अशाच दाव्यांसह इतर एक्स पोस्ट्स येथे, येथे आणि येथे पाहायला मिळतात. तसेच, हा व्हिडिओ फेसबुकवरही अशाच दाव्यांसह शेअर केला जात आहे. अशा काही पोस्ट्स येथे आणि येथे पाहू शकता.

बैलाच्या हल्ल्यातून मुलाला वाचवणाऱ्या गायीच्या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्यातील कीफ्रेम्स रिव्हर्स सर्च केल्या. या तपासादरम्यान हा व्हिडिओ 28 ऑक्टोबर 2025 रोजी एका यूट्यूब चॅनेलवर अपलोड झाल्याचे आढळले. व्हिडिओच्या वर्णनात (description) पोर्तुगीज भाषेत लिहिले आहे — “गायीने मुलाला बैलापासून वाचवले.” तसेच, व्हिडिओच्या वर्णनात #SoraAI हा हॅशटॅग असून, डिस्क्लेमरमध्ये हा व्हिडिओ “संशोधित (Altered)” किंवा “कृत्रिम (Synthetic)” असल्याचे स्पष्ट नमूद आहे.
व्हिडिओ बारकाईने पाहिल्यावर त्यात अनेक विसंगती आढळतात, गायीजवळ असलेल्या मुलाचे पाय अस्पष्ट आणि धूसर दिसतात, तसेच गायीच्या पायाजवळ उडणारी धूळ कधी दिसते, तर कधी पूर्ण गायब होते. या सर्व बाबींमुळे हा व्हिडिओ AI च्या सहाय्याने तयार केलेला असावा, असा संशय निर्माण झाला.
व्हायरल व्हिडिओला AI Detection Tool — Hive Moderation च्या साहाय्याने तपासले असता, तो व्हिडिओ AI किंवा Deepfake असण्याची शक्यता 97.6% असल्याचे निष्पन्न झाले.

व्हिडिओबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही Trusted Information Alliance (TIA) च्या Deepfake Analysis Unit (DAU) ची मदत घेतली, ज्याचा Newschecker सुद्धा एक भाग आहे. DAU ने व्हिडिओतील अनेक फ्रेम्स वेगवेगळ्या AI टूल्सच्या सहाय्याने तपासल्या. WasItAI या टूलने व्हिडिओतील दृश्ये AI ने तयार केलेली असण्याची शक्यता दर्शवली.

IsItAI ने देखील दृश्ये AI निर्मित असल्याची शक्यता व्यक्त केली.

AI or Not या टूलच्या विश्लेषणानुसार व्हिडिओतील दृश्ये AI जनरेटेड आहेत.

Image Whisperer या टूलनेही व्हिडिओ AI ने तयार केलेला असल्याचे निष्कर्ष दिले.

आमच्या पडताळणीत मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होते की बैलाच्या हल्ल्यातून मुलाला वाचवणाऱ्या गायीचा हा व्हायरल व्हिडिओ AI जनरेटेड आहे.
Sources
YouTube video, @aloisionaroca, October 28, 2025
Hive Moderation
DAU analysis
JP Tripathi
November 27, 2025
JP Tripathi
November 21, 2025
Vasudha Beri
November 12, 2025