Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
AI/Deepfake
दारूच्या नशेत वाघाच्या डोक्यावर हात फिरवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ.
हा व्हिडिओ AI जेनरेटेड आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे ज्यात एक व्यक्ती वाघाच्या डोक्यावर हात फिरवताना दिसतो. त्या व्यक्तीच्या हातात एक बाटली आहे आणि तो वाघाला दारू पाजण्याचा प्रयत्न करताना दिसतो. दावा केला जात आहे की दारूच्या नशेत धुत राजू पटेल नावाच्या व्यक्तीने रात्री वाघाला दारू पाजण्याचा प्रयत्न केला.
एक्स पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “52 वर्षीय राजू पटेलने रात्री ‘बिल्ली’ समजून खरी वाघिणीच्या डोक्यावरून हात फिरवला! ठर्रेच्या नशेत म्हणाला ‘हट न बे किटी.’ वाघाने काहीच नाही म्हटलं, फक्त शांत उभा राहिला. आता सकाळपासून राजूच्या घरी लाईन लागलीये कोणता ब्रँड पिऊन आला होता विचारायला.”
पोस्टचा आर्काइव्ह येथे पाहा. असे इतर एक्स पोस्ट्स येथे, येथे आणि येथे पाहा. हा व्हिडिओ पेंच टायगर रिझर्व्ह, मध्य प्रदेशचा असल्याचा दावा केला जात आहे. फेसबुकवरील पोस्ट्स येथे, येथे आणि येथे पाहा.

दारूच्या नशेत वाघाच्या डोक्यावर हात फिरवणाऱ्या व्यक्तीच्या या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्ड्सने गूगल सर्च केले. या दरम्यान ‘द सूत्र’ने पेंच टायगर रिझर्व्हचे उपसंचालक रजनीश सिंह यांच्या संदर्भात प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ पेंच टायगर रिझर्व्हचा नाही.
व्हिडिओ पाहताना त्यात अनेक विसंगती दिसतात. व्यक्तीचा हात आणि पँट (पतलून) विचित्र दिसतात. वाघाचे पंजेही सामान्य स्वरूपात दिसत नाहीत. त्यामुळे व्हिडिओ AI ने तयार असल्याचा संशय आम्हाला आला.

व्हिडिओची पुढील पडताळणी करण्यासाठी आम्ही मिसइन्फॉर्मेशन कॉम्बॅट अलायन्सच्या डीपफेक अॅनालिसिस युनिट (DAU) शी संपर्क साधला, ज्याचा न्यूजचेकर हा सदस्य आहे. DAU ने व्हिडिओतील कीफ्रेम्स विविध AI डिटेक्शन टूल्सने तपासले. WasItAI ने व्हिडिओ AI-जनरेटेड असण्याची शक्यता दर्शवली.

AI or Not नेही या क्लिपमध्ये AI चे घटक असल्याचे संकेत दिले.

IsItAI टूलने देखील हा व्हिडिओ AI निर्माण केलेला असल्याचे सांगितले.

आमच्या पडताळणीतून स्पष्ट झाले की दारूच्या नशेत वाघाच्या डोक्यावर हात फिरवणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडिओ AI जेनरेटेड आहे.
Sources
DAU analysis
Self analysis
Prasad S Prabhu
November 8, 2025
JP Tripathi
November 7, 2025
JP Tripathi
August 19, 2025