Monday, April 7, 2025

AI/Deepfake

समुद्री गाय म्हणून व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात AI-जनरेटेड आहे

Written By Mohammed Zakariya, Translated By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Jul 12, 2024
banner_image

Claim

व्हिडिओमध्ये नव्याने सापडलेल्या प्राण्याची प्रजाती असून, त्याला गाईचे तोंड असलेला सील किंवा समुद्री गाय असे म्हटले जात आहे.

न्यूजचेकरला आमच्या व्हॉट्सॲप टिपलाइनवर (+91-9999499044) वस्तुस्थिती तपासण्याची विनंती करीत हा व्हिडिओ प्राप्त झाला आहे.

समुद्री गाय म्हणून व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात AI-जनरेटेड आहे

आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर देखील मिळाला.

समुद्री गाय म्हणून व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात AI-जनरेटेड आहे
WhatsApp Viral Message

Fact

Google वर “काउ-फेस्ड सील” साठी कीवर्ड शोधात अशा सागरी प्रजातीच्या शोधाबद्दल कोणतेही विश्वसनीय रिपोर्ट मिळाले नाहीत.

त्यानंतर आम्ही गुगल लेन्सवर व्हायरल फुटेजच्या कीफ्रेम्स पाहिल्या ज्यामध्ये ‘King.Efren.’ या युजरची टिकटॉक पोस्ट आली. आम्ही VPN वापरून साइटवर प्रवेश केला. पोस्टमध्ये सीलच्या कथित नवीन प्रजातीचा समान व्हिडिओ आहे.

खात्यात पाहताना आम्हाला, असे अनेक व्हिडिओ आढळले ज्यामध्ये डुकराच्या चेहऱ्याचा मासा, वाघाच्या चेहऱ्याचा मासा आणि कोंबड्यांचा चेहरा असलेला कुत्रा यांसारख्या अस्तित्वात नसलेल्या प्राण्यांच्या प्रजातींबद्दल भाष्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अशा पोस्टच्या कॉमेंट विभागात अनेक युजर्सनी त्या व्यक्तीच्या संपादन कौशल्याची प्रशंसा केली.

न्यूजचेकरने TikTok युजर King.Efren यांच्याशी संपर्क साधला आहे आणि त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर हा लेख अपडेट केला जाईल.

समुद्री गाय म्हणून व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात AI-जनरेटेड आहे
Screengrabs from TikTok profile of @King.Efren

त्यानंतर आम्ही व्हिडिओबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी The Misinformation Combat Alliance (MCA) च्या Deepfakes Analysis Unit (DAU) शी संपर्क साधला, ज्याचा Newschecker हा एक भाग आहे. विद्यमान AI शोध साधने केवळ मानवी चेहरे ओळखतात, असे आम्हाला सांगण्यात आले. तथापि, प्रॉम्प्ट-टू-एआय जनरेटरचा वापर करून फुटेज तयार केल्याचे आढळून आले.

शिवाय, पार्श्वभूमीत एक व्यक्ती असून तिला तीन पाय असल्याचे दिसत आहे. आम्हाला अशाच प्राण्याचा आणखी एक व्हिडिओ सापडला आहे ज्यामध्ये स्पष्ट अस्वीकरण आहे की तो AI वापरून तयार केला गेला आहे.

समुद्री गाय म्हणून व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात AI-जनरेटेड आहे
(L-R) Screengrab from viral video and screengrab from a similar AI generated video

आम्ही Deepfake Detector वेबसाइटवर देखील व्हिडिओ पाहिला ज्याने हे दाखवले की फुटेज “likely a deepfake” आहे.

समुद्री गाय म्हणून व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात AI-जनरेटेड आहे

अर्थात, व्हिडिओ वास्तविक प्राणी प्रजाती दर्शवत नसून AI साधनांचा वापर करून तयार केला गेला आहे.

Result: False

Sources
TikTok Post By King.Efren
DAU Analysis
Newschecker Analysis


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,698

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage