Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
AI/Deepfake
भारत भेटीदरम्यान व्लादिमीर पुतिन यांनी राम मंदिराला भेट दिल्याचा फोटो
हा दावा खोटा आहे. ही प्रतिमा एआय द्वारे तयार केलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत राम मंदिरासमोर उभे असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. असा दावा केला जात आहे की पुतिन त्यांच्या भारत भेटीदरम्यान राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेले होते. हा फोटो शेअर करून नरेंद्र मोदींचे कौतुक केले जात आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “वाह! मोदीजी, तुम्ही पुतिनजींना राम मंदिराचे दर्शनही घडवले. जय श्री राम.” पोस्टचा संग्रह येथे पहा. अशाच दाव्यांसह इतर व्हायरल पोस्ट येथे, येथे आणि येथे पहा.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन राम मंदिराला भेट देत असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल इमेजचा रिव्हर्स सर्च केला असता, या दाव्याला समर्थन देणारा कोणताही विश्वासार्ह रिपोर्ट मिळाला नाही. कीवर्ड सर्च केल्यावर आम्हाला ४ डिसेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर पुतिन यांच्या भेटी आणि त्यांच्या वेळापत्रकाबाबत जारी केलेल्या मीडिया अडव्हायझरी सापडल्या. त्यात पुतिन यांच्या भारतात आगमन आणि प्रस्थानाची माहिती दिली आहे, परंतु अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्याचा कोणताही उल्लेख नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ४ डिसेंबरच्या संध्याकाळी भारतात आलेले व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर रशियाला परतले. या काळात दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे २३ वी भारत-रशिया वार्षिक बैठक झाली. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करारही झाले. मीडिया रिपोर्ट्समध्ये व्लादिमीर पुतिन यांनी भारत भेटीदरम्यान अयोध्याला भेट दिल्याचा उल्लेख नाही.
व्हायरल फोटो पाहिल्यावर आम्हाला अनेक विसंगती आढळल्या. उदाहरणार्थ, तिन्ही लोकांच्या चेहऱ्यावरील जास्त तेज आणि हसताना योगी आदित्यनाथ यांच्या ओठांचा असामान्य आकार. पुतिन आणि योगी आदित्यनाथ मोजे घातलेले दिसतात, तर पंतप्रधान मोदी अनवाणी आहेत. यामुळे आम्हाला शंका आली की ही प्रतिमा एआयने तयार केली आहे.

प्रतिमेची सत्यता पडताळण्यासाठी, आम्ही त्याची चाचणी AI डिटेक्शन टूल Hive Moderation वर केली. या टूलने AI द्वारे प्रतिमा तयार होण्याची 99.9 टक्के शक्यता दर्शविली.

Sightengine च्या मदतीने फोटो तपासल्यानंतर असे आढळून आले की हा फोटो ९९ टक्के एआय जनरेटेड आहे.

Imagewhisperer ने भी इस तस्वीर के काफी हद तक AI से बने होने की संभावना जताई।

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होते की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राम मंदिराला भेट दिल्याचा व्हायरल फोटो खरा नाही, तर तो एआयने तयार केलेला आहे.
Sources
Media Advisory by MEA On Dec 4, 2025
Hive Moderation
Sightengine
Image Whisperer
Runjay Kumar
December 4, 2025
Vasudha Beri
December 4, 2025
Runjay Kumar
December 4, 2025