Claim–
पाकिस्तानचे पतंप्रधान इमरान खान यांनी कोरोना व्हायरसचा धोका असताना देखील मास्क लावून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिपनिंग यांना भेटले कारण पाकिस्तानला आता कर्जाची गरज आहे.
Verification– पाकिस्तानचे पंतप्रधान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल होत. या फोटोत इम्रान खान यांनी तोंडाला मास्क लावल्याचे दिसत आहे. तसेच या फोटोबद्दलच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की व्हायरस पसरला असतानाही इम्रान खान चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेत आहेत. कारण आता त्यांना कर्जाची गरज आहे.
आम्ही याबाबत सतत्या शोधण्याचा प्रयत्न केला. गूगलमध्ये काही कीवर्ड्च्या आधारे शोध घेतला असता आम्हाला इम्रान खान यांनी चेह-याला मास्क लावून शी जिपनिंग यांची भेट घेतल्याची बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही व्हायरल फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला मागील वर्षीच्या अनेक बातम्या दिसून आल्या.त्यात हा फोटो होता मात्र इम्रान खान यांच्या चेह-यावर मास्क नव्हता.
याशिवाय आम्हाला
इकाॅनाॅमिक टाईम्सच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी बिजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शि- जिपनिग यांची भेट घेतली यावेळी कराची-पेशावर रेल्वे मार्ग सुधारित करणे, मुक्त व्यापार कराराच्या दुसर्या टप्प्याचा शुभारंभ आणि कोरड बंदर उभारणे यासह चीन आणि पाकिस्तान यांच्यात 60 अब्ज डॉलर्सचा करार झाला.
यावरुन हेच स्पष्ट होते की, इमरान खान आणि शि- जिपनिंग यांच्या मागील वर्षीचा फोटो एडिट करुन तो सध्या कोरोना व्हायरस परसल्या दरम्यानचा असल्याचा खोटा दावा पसरवण्यात आला आहे.
Sources
Facebook Search
Google Reverse Image
Result- Fasle
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)