Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
Claim- कोरोनाग्रस्तांवर 24 तास उपचार करणा-या इंदोर येथील महिला डाॅक्टर वंदना तिवारी आपल्या तीन वर्षाच्या बाळाला सोडून गेल्या.कोरोनाने त्यांचा जीव घेतला.
सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅटवर एक पोस्ट व्हायरल होत असून यात म्हटले आहे की, इंदोर येथील डाॅक्टर वंदना तिवारी या 24 तास कोरोनाग्रस्तांची सेवा करत होत्या. तीन वर्षांच्या लहान बाळाला सोडून त्या गेल्या. कोरोनानेच त्यांचा जीव घेतला.
Verification- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली, गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला या संदर्भात फेसबुकवर अनेक पोस्ट आढळून आल्या. यात हाॅस्पिटलमध्ये बेडवर उपचार सुरु असलेल्या महिलेचा फोटो शेअर केला असून यात म्हटले आहे की, हा फोटो डाॅ. वंदना तिवारी यांचा असून त्या मागील आठवड्यात उत्तर प्रदेशात कोरोनाग्रस्तांचा उपचार करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी जिहादी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्या यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचा 9 एप्रिल रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
https://www.facebook.com/photo?fbid=2961706440557816&set=a.501638996564585
https://m.facebook.com/story.php?story_fbid=891493131367335&id=100015199690693
एकाच नावाच्या महिला डाॅक्टरच्या नावाने वेगवेगळे दावे व्हायरल झाल्याने संभ्रम निर्माण झाला. या महिला डाॅक्टरचा मृत्यू नेमका कोरोनामुळे की माॅब लिंचिंगमुळे झाला याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. याशोधा दरम्यान आम्हाला द लोकनीती या हिंदी वेबसाईटवर या संदर्भात बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, शिवपुरी मेडिकल काॅलेजमध्ये फार्मासिस्ट पदावर कार्यरत वंदना तिवारी यांचा ब्रेन हॅमरेज मुळे मृत्यू झाला. त्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसमुळे सतत काम करत होत्या. त्यांच्या पती ने हाॅस्पिटल प्रशासन आणि सरकारच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
शोधा दरम्यान आम्हाला उत्तर प्रदेश पोलिसांचे ट्विट आढळून आले ज्यात म्हटले आहे की उत्तर प्रदेशात अशी घटना घडलेली नाही हे प्रकरण मध्य प्रदेशातील आहे.
Newschecker Team
March 25, 2020
Newschecker Team
May 2, 2020
Newschecker Team
April 20, 2020