Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeCoronavirusCOVID-19 :  चीन मृतांचा खरा आकडा लपवत आहे, दिड कोटी लोकांचा मृत्यू...

COVID-19 :  चीन मृतांचा खरा आकडा लपवत आहे, दिड कोटी लोकांचा मृत्यू झाला ? जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim
चीनमध्ये आता पर्यंत 1 कोटी 50 लाख लोकांचा कोरोना विषाणू संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. चीन खरी आकडेवारी लपवत आहे.
 
दाव्याचे संक्षिप्त विवरण
सोशल मीडियामध्ये चीनमधील कोरोना विषाणूच्या स्थिती संदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे यात म्हटले आहे की, चीनमध्ये या विषाणूने आतापर्यंत 1 कोटी 50 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र चीन जगापासून खऱा आकडा लपवत आहे. तेथील मीडियावर सरकारचे नियंत्रण असल्याने खरी माहिती बाहेर येत नाही.
आम्ही या संदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता बीबीसी न्यूज च्या बातमीनुसार चीनमध्ये आतापर्यंत 3303 लोकांचा मृत्यू झाला असल्याची महिती मिळाली मात्र काही चिनी नागरिकांनी सरकारी आकडेवारीवर आक्षेपत घेत चीन खऱी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप केला असल्याचे आढळून आले. यासाठी ते मोबाईल युजर्स कमी झाल्याचा दाखला देत आहेत.
चीन ने नुकताच मोबाईल युजर्स संदर्भात सरकारी मासिक डाटा प्रसिद्ध केला होता. यात म्हटले आहे की, 2.1 कोटी युजर्स कमी झाले आहेत. रिपोर्ट नुसार चायना मोबाईलचे 80 लाख तर चायना युनिकाॅमचे 78 लाख तर चायना टेलिकाॅमचे 56 लाख युजर्स कमी झाले आहेत.  रिपोर्टनुसार ब-याच चिनी लोकांकडे एक पेक्षा जास्ता सिमकार्ड असतात. theepochtimes.com या वेबसाईटच्या लेखानुसार चीनमध्ये शाळा काॅलेज बंद झाल्यानंतर विद्यार्थी फोन द्वारे आॅनलाइन क्लासला हजेरी लावत आहेत. अनेकांनी नवीन मोबाईल नंबर घेतले असल्याची शक्यता आहे. तसेच रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चीनमध्ये अनेक स्थलांतरित लोक काम करतात ते लोक जानेवारीमध्ये चीनचे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आपल्या घरी गेले असतील व नंतर बंदी मुळे ते परतले नसतील त्यामुळे देखील ही संख्या घटल्याची शक्यता आहे. तसेच शट डाऊनमुळे अनेक लोकांनी खर्चात कपात करण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करणे टाळले असावे.
हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर चीनने वाशिंग्टन जर्नल, न्यूर्याक टाईम्स आणि वाशिंग्टन पोस्टच्या पत्रकारांना देश सोडण्यास भाग पाडले होते या पत्रकारांनी आपल्या बातम्यांमध्ये चीन मृतांचा खरा आकडा लपवत असल्याचे म्हटले होते.
याबाबत आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि इतर जगभराती नामवंत संस्थांच्या वेबसाईट तपासून पाहिल्या पण कुठेही चीन ने आकडेवारी लपविल्याचा आरोप करण्यात आल्याचे आढळून आले नाही.
तसेच व्हायरल पोस्टमधील मृतांचे फोटो देखील रिव्हर्स इमेजच्या मदतीने तपासले असता पहिला फोटो हा तीन वर्षांपूर्वी  सीरियामधील गॅस हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा असल्याचे आढळून आले.
तसेच दुसरा फोटो नेमका कुठला आहे याचा शोध घेतला असता तो फोटो दिड वर्षापुर्वीचा कांगो मधील असल्याचे आढळून आले.
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल फोटो चीनमधील कोरोना विषाणून मृत झालेल्यांचे नाही तसेच संख्या दिड कोटीपेक्षा जास्त असल्याच्या बातमीत तथ्य नाही. जागतिक आरोग्य संघटना किंवा या विषयी काम करणा-या कोणत्याही जागतिक संस्था अथा संघटनने अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियात व्हायरल होत असलेली पोस्ट भ्रामक असल्याचे सिद्ध होते.
Source 
Twitter Advanced Search
Google keyword Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular