Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा अनेक नागा साधूंसोबत बसल्याचे एक चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दावा करण्यात येत आहे की, गृहमंत्री शहा आणि येडियुरप्पा नागा सांधूसोबत कोरोना लसीसंदर्भात चर्चा करत आहेत.
संग्रहित
याशिवाय फेसबुकवर देखील हा दावा व्हायरल झाल्याचे आढळून आले.
Fact Check / Verification
गृहमंत्री अमित शहा आणि येडियुरप्पा यांनी नागा साधूंची कधी भेट घेतली होती याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या साहाय्याने शोध घेतला मात्र अपेक्षित परिणाम मिळाले नाही.
यानंतर आम्ही रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून व्हायरल फोटोचा शोध घेतला असता आम्हाला oneindia या वेबसाईटवर दोन वर्षापूर्वीच्या एका बातमीत येडियुरप्पा यांचा नागा साधूंसोबतचा फोटो आढळून आला. बातमीत म्हटले आहे की, ऑक्टोबर 2017 मध्ये 18 नागा साधूंनी बी एस येडियुरप्पा यांच्या बेंगळुरू येथे घरी भेट दिली होती. साधूंच्या मते येडियुरप्पा राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि भारतीय जनता पक्षाचे (भविष्य) उज्ज्वल भविष्य होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. तथापि, अंदाजानुसार येडियुरप्पा 54 तासाचे मुख्यमंत्री झाले आणि भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष देखील बनला. मात्र या फोटोत किंवा बातमीत कुठेही अमित शहा यांचा उल्लेख नाही.
याशिवाय येडियुरप्पा यांच्या घरी नागासाधूंनी भेट दिल्याची बातमी सुवर्णा टिव्ही या कन्नड टिव्ही चॅनलने देखील त्यावेळी दिली होती त्याचा व्हिडिओ देखील यूट्यूबवर आढळून आला.
यावरुन हेच स्पष्ट होते की अमित शहांच्या उपस्थितीमध्ये येडियुरप्पा आणि नागा साधुची भेट झाली नव्हती. मग अमित शहांचा हा फोटो नेमका कुठला आहे याचा गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. tribuneindia.com वर बातमीत आढळून आली ज्यात अमित शहांचा व्हायरल फोटो आहे. बातमीत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रमुख अमित शहा यांनी शुक्रवारी पक्षाचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना आशीर्वाद मिळावा अशी विनंती केली.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, अमित शहांचा फोटो माॅॅर्फ करुन येडियुरप्पा आणि नागा साधूंसोबत जोडून चुकीच्या दावा सोशल मीडियात केला जात आहे.
Result- False
Sources
tribuneindia- https://www.tribuneindia.com/news/archive/nation/pm-narendra-modi-amit-shah-meet-advani-joshi-777684
suvarnatv- https://www.youtube.com/watch?v=3A0T-x_a25k
oneindia- https://www.oneindia.com/india/naga-sadhus-prediction-on-karnataka-elections-come-true-2700527.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.