Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
दावा- महाराष्ट्राच्या राज्यपालांनी लाॅकडाऊनचे नियम डावलून माॅडेलला लष्काराच्या हेलिकाॅप्टरने दिल्लीला पोहचविले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याबाबतीत सोशल मीडियाध्ये एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात म्हटले आहे की, राज्यपालांनी टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत विशेष पास द्वारे एका माॅडेलला लष्कराच्या हेलिकाॅप्टरने मुंबई वरुन दिल्लीत पोहचविले नंतर तेथून हिमाचल प्रदेशातील डेहराडूण येथे देखील लष्कराच्या गाडीने पोहचविले.
पडताळणी-आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता आम्हाला पंजाब केसरी या हिंदी दैनिकाच्या वेबसाईटवर ही बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, कोरोना जागतिक महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन लागू केले गेले आहे. एकीकडे पोलिस आणि प्रशासनातर्फे या टाळेबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, दुसरीकडे असे काही राजकारणी आहेत जे नियम मोडण्यास कोणतीही कसर सोडत नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी असाच एक पराक्रम केला आहे. राज्यपालांनी जैनी उर्फ जयंती ह्या मॉडेलला महाराष्ट्रातून लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरने दिल्लीत पोहचवले. यानंतर लष्कराच्या गाडीने डेहराडूण येथील तिच्या घरी पाठविण्यात आले. राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या विशेष व्यवस्थेमुळे ही मॉडेल तिच्या घरी पोहोचली आणि तिला समजले की ती आता तिला आपल्या कुटूंबासह होम कोरोंटाइन करण्यात आले आहे. असे असूनही मॉडेल आणि तिचे कुटुंबिय विलगीकरणाचे नियम पाळत नाहीत.
याशिवाय आम्हाला याच दाव्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.
आम्ही याबाबतीत पुढे शोध सुुरु ठेवला असता rnamarathi.wordpress.com या वेबसाईटवर माॅडेल जैनी उर्फ जयंती जैन हिने केलेल्या खुलाशा संदर्भात माहिती मिळाली. यात म्हटले आहे की, चौकशी दरम्यान तिने सुरवातीला महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या शिफारशीवरून आल्याच सांगितलं होतं, त्यामुळे तशा बातम्या उत्तराखंड मध्ये व्हायरल झाल्या होत्या, पण आता त्या मॉडेलने आपण हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी पत्र दिल्यामुळे आल्याचं सांगितलं आहे, त्याबाबतची कागदपत्रही तिने दाखविली. यावर आता उत्तर का बदललं अस तिला विचारलं असता, ती मॉडेल सांगते, “मी महाराष्ट्रातून आली जरूर आहे पण ती दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, माझं म्हणणं समजून घेण्यात गैरसमज निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे यात नाव आले.”या वेबसाइटवर राजभवन शिमला यांचे कांगराचे डेप्युटी कमिश्नर यांना लिहिलेले पत्र देखील शेअर कऱण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुंबईत राजभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या संदर्भात काही बातम्या आधी उत्तराखंडमधील वर्तमानपत्रात छापून आल्या होत्या पण व्हायरल बातमीमध्ये काही तथ्य नाही. कुणीतरी खोडसाळपणाने राज्यपालांच्या नावाने ही भ्रामक बातमी सोशल मीडियात पसरवली आहे. आमच्या कार्यालयातील वरिष्ठ लोक याबद्दल सायबर क्राइमकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. तपासातून कुणी खोडसाळपणा केला आहे हे समोर येईल.
यावरुन हेच स्पष्ट होते की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी सोशल मीडियात भ्रामक पोस्ट आणि बातम्या व्हायरल झाल्या आहेत. माॅडेलला तिच्या घरी पोहचविण्यासंदर्भात हिमाचल प्रदेशच्या राजभवन मधून पत्र देण्यात आले होते.
Source
Google Search, Facebook Search
Result- Misleading(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)