Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeCoronavirusभारतात कोरोनावरील लसीच्या वापरास मंजुरी मिळालेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

भारतात कोरोनावरील लसीच्या वापरास मंजुरी मिळालेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

भारतात कोरोनावरील लसीच्या वापरास मंजुरी मिळाली असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅटवर ही बातमी खूप व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, अखेर भारताही कोरोनावरील लशीला मंजुरी मिळाली आहे. पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट ने तयार केलेल्या लशीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतात आता कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच लसीकरण केले जाणार आहे.

फेसबुकवर देखील हा दावा व्हायरल झाल्याचे आढळून आले आहे.

संग्रहित

Fact Checking/Verification

भारतात कोरोनावरील लसीच्या वापरास मान्यता मिळाली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगलमध्ये याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला झी बिझनेसच्या वेबसाईटवर 28 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, आॅक्सफोर्डच्या कोविशिल्ड या कोरोना लसीचे 5 कोटी डोस सिरम इंस्टिट्यूटने तयार केले असल्याची माहिती आदर पुनावाला यांनी दिली आहे. मात्र यास सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

याबाबत अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला 30 डिसेंबर रोजी अमर उजालाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, कोरोना लशीच्या आपतकालीन वापरला भारतात मंजुरी मिळालेली नाही. देशात नवीन वर्षात लस येण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणून सिरम इंस्टिटयूचट्या आदर पुनावाला यांनी लसीच्या आपतकालीन वापरासाठी परवानगी मागितली होती पण ड्रग कंट्रोलर आॅफ इंडियाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आलेली नाही. यासाठी आता 1 जानेवारी रोजी बैठक होणार आहे. आॅक्सफोर्डच्या लसीला ब्रिटनमध्ये परवानगी मिळलेली आहे, भारतात ही लस सिरम इन्स्टिटयूट करत आहे.

या शिवाय आम्हाला दैनिक लोकसत्ताच्या 31 डिसेंबर 2020 च्या अंकात देखील ही बातमी आढळून ज्यात सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांच्या लसीला सध्या तरी मंजुरी दिली नसल्याचे म्हटले आहे.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, भारतात कोरोना लसीच्या आपतकालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली नाही, सोशल मीडियात चुकीची माहिती व्हायरल झाली आहे.

Result: False

Our Sources

लोकसत्ता- https://epaper.loksatta.com/2942777/loksatta-pune/31-12-2020#page/3/2

अमर उजाला- https://www.amarujala.com/india-news/cdsco-expert-panel-to-reconvene-on-jan-1-to-consider-emergency-use-authorisation-for-covid-vaccines

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular