Monday, March 17, 2025
मराठी

COVID-19 Vaccine

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व निर्माण होते? हे आहे सत्य

Written By Yash Kshirsagar
Jun 13, 2021
banner_image

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व निर्माण होते, असा प्रत्यय नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाला आला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे तसचे अनेक न्यूजवेबसाईट्स आणि चैनल्सने ही बातमी प्रसारित केली आहे. याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत ज्येष्ठ नागरिकाच्या शरीरावर लोखंड व स्टीलच्या वस्तू चिटकत दिसते. त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच या वस्तू शरीरावरावर चिटकत असल्याचा दावा सोशळ मीडियात केला आहे.

आम्हाला फेसबुकवर महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून ज्यात म्हटले आहे की, करोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर शरीरावर लोखंड व स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा अजब दावा नाशिकमधील 70 वर्षीय व्यक्तीने केला आहे. मात्र पालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी लसीमुळे असे घडल्याची शक्यता नाकारली असल्याचे देखील बातमीत म्हटले आहे.

संग्रहित

Fact Check/Verification

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व तयार होते असा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही लस घेतल्यानंतर खरंच शरीरात चुंबकत्व निर्माण होते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला व्हायरल दाव्यामध्ये तथ्य नसल्याचे माहिती सांगणारे अनेक लेख तसेच व्हिडिओ आढळून आले.

यात माझा पेपर या वेबसाईटवर व्हायरल दाव्या संबंधी बातमी आढळून आली. बातमीत म्हटले आहे की, हा दावा तज्ज्ञांना हा दावा फेटाळला आहे. “राज्याच्या कोवड-19 कृतीदलाचे सदस्य तात्याराव लहाने यांनी लसीचा आणि शरीराला स्टीलचा वस्तू चिकटण्याचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोव्हिशिल्ड लसीचे आपण अनेकांना डोस दिले आहेत. त्यांच्या शरीराला स्टील चिकटत असले तरी त्याचा आणि लसीचा कोणताही संबंध नाही. तसेच या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यांच्या शरीराला स्टील तसेच लोखंड चिकटते. त्यांच्या त्वचेला काहीतरी असावे, नाशिकमध्ये त्यांची तपासणी करायला हवी. परंतु याचा आणि लसीचा संबंध लावणे योग्य नाही. कारण लसीमुळे असे काही घडत नाही.” असे बातमीत म्हटले आहे.

याशिवाय दिव्य मराठीच्या वेबसाईटवर देखील आम्हाला यासंदर्भात बातमी आढळून आली. यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संबंधित दावा खोटा असल्याचे सिद्ध केल्याचे म्हटले आहे. काेराेना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सिडकाेतील ज्येष्ठ नागरिकांच्या शरीराला चमचे, नाणे, उचटणे चिकटत असल्याचे समाेर आले हाेते. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यंानी सत्यशोधन करण्याचा प्रयत्न केला. हवेचा दाब कमीत कमी झाल्यावर त्वचा आणि ती वस्तू एकमेकाला चिकटतात, असे सांगत समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठे ताट त्वचेला चिकटते हे दाखवून दिले. त्याचा व्हिडिओ तयार करत ताे प्रसारित केला. प्लॅस्टिकची वस्तूही अंगाला चिकटते. त्यामुळे चुंबकत्व निर्माण झाल्याचा दावा खाेटा असल्याचे अंनिसने स्पष्ट केले. सिडकाेतील त्या ज्येष्ठ नागरिकानेही यामागचे शास्रीय कारण शोधावे असा आग्रह धरला आहे. आरोग्य विभागानेही याबाबत वैद्यकीय सत्य समाजापुढे आणावे आणि लसीकरणाबद्दल कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन समितीचे डाॅ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, नितीन बागूल यांनी केले आहे. तसेच शहरात लस न घेतलेल्या लोकांनी देखील हा प्रयोग करुन पाहिला असता त्यांच्याही शरीराला अगदी प्लास्टिकच्ा वस्तू देखील चिकटल्या असल्याचे बातमीत म्हटले आहे.

तसेच या दावा खोटा असण्याचे प्रात्ययक्षिक करुन दाखविणारा अंनिसचा व्हिडिओ देखील आम्हाला युट्यूबवर आढळून आला.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व निर्माण होत नाही. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Read More : रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही

Result: False

Claim Review:  कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व निर्माण होते
Claimed By: Viral Post
Fact Check: False

Our Sources

माझा पेपर- https://www.majhapaper.com/2021/06/10/covishield-vaccine-creates-magnetism-in-the-body-of-a-person-in-nashik-experts-rejected-the-claim/

दिव्य मराठी- https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/corona-vaccine-safe-sticking-the-substance-examination-of-senior-citizens-by-the-medical-team-nashik-128584287.html


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,453

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.