Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
COVID-19 Vaccine
कोरोनाची लस घेणा-यांचा दोन वर्षात मृत्यू होणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे, परंतु ही लसीकरण मोहिम वेगाने वाढविली जात असताना सोशल मीडियावर याविषयी रोज नवनवीन भ्रामक दावेही वाढत आहेत. कधी वाझंपणाचा तर कधी महिलांवर होणा-या दुष्परिणामाचा असे अनेक मेसेज लसीकरणासंदर्भात शेअर होतात. अशातच हा नवीन दावा व्हायरल झाला आहे.
आमच्या एका वाचकाने व्हाटसअॅपवर व्हायरल होत असलेला हा दावा आमच्याकडे पडताळणीसाठी पाठविला आहे. यात ज्या लोकानी घेतली आहे त्यांच्यासाठी जगण्याची कोणतीही शक्यता नाही असा नोबेल पारितोषिक विजेते ल्यूस मॉन्टॅग्निअर यांनी हा दावा केला असल्याचे म्हटले आहे.
मेसेजमध्ये नेमके काय म्हटले आहे?
सर्व लसीकरण केलेले लोक 2 वर्षात मरणार आहेत
“नोबेल पारितोषिक विजेते ल्यूस मॉन्टॅग्निअर यांनी पुष्टी केली आहे की ज्या लोकांना लसीचे कोणतेही स्वरूप प्राप्त झाले आहे त्यांच्यासाठी जगण्याची कोणतीही शक्यता नाही. धक्कादायक मुलाखतीत जगातील अव्वल व्हायरलॉजिस्टने अगदी स्पष्टपणे सांगितले: “ज्यांना आधीच लसी दिली गेली आहे त्यांच्यासाठी कोणतीही आशा नाही आणि कोणतीही संभाव्य उपचार नाही. आपण मृतदेह जाळण्यासाठी तयार असलेच पाहिजे.” वैज्ञानिक अलौकिक बुद्धिमत्तेने लसीतील घटकांचा अभ्यास केल्यावर इतर प्रख्यात विषाणूशास्त्रज्ञांच्या दाव्याचे समर्थन केले. “Allन्टीबॉडी-आधारित वर्धिततेमुळे ते सर्व मरतील. यापुढे आणखी काही सांगता येणार नाही.” “ही एक प्रचंड चूक आहे, नाही का? एक वैज्ञानिक त्रुटी तसेच वैद्यकीय त्रुटी. ही एक न स्वीकारलेली चूक आहे, ”असे मॉन्टॅग्निअर यांनी काल रायर फाउंडेशन यूएसएने अनुवादित आणि प्रकाशित केलेल्या मुलाखतीत सांगितले. “इतिहासाची पुस्तके दर्शवेल, कारण ती लसीकरण रूपे तयार करीत आहे.” “एन्टीबॉडी-आधारित वर्धित वाढ” म्हणून ओळखल्या जाणार्या समस्येबद्दल बरेच साथीचे रोगशास्त्रज्ञांना हे माहित आहे आणि ते “शांत” आहेत.“
ट्विटरवर हा दावा व्हायरल होत आहे.
पोस्टमध्ये रायर फाउंडेशन यूएसए उल्लेख असल्याने आम्ही व्हायरल दाव्याचे सत्य शोधण्यासाठी Google वर काही कीवर्डच्या आधारे शोध घेतला. त्यादरम्यान, व्हायरल क्लेमसंबंधित रायर फाउंडेशन यूएसएच्या वेबसाइटवर 18 मे 2021 रोजी प्रकाशित झाल्याचे आढळले. आम्ही हा अहवाल संपूर्ण वाचला, परंतु तेथे व्हायरल होत असलेल्या गोष्टींचा उल्लेख आढळला नाही. यात असा कोठेही उल्लेख नाही की, प्रोफेसर ल्यूक माँटॅग्निअर असे म्हणतात की ज्या लोकांनी कोरोना लस घेतली ते वाचण्याची शक्यता नाही, त्यांचा मृत्यू दोन वर्षांत होईल, परंतु या कोरोना लसीबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी लिहिल्या गेल्या. प्रो. ल्यूक मॉन्टॅग्निअर यांनी दिलेल्या मुलाखतीत दिलेल्या विधानांवर हा अहवाल लिहिला गेला आहे.
प्राप्त माहितीच्या आधारे, आम्ही पुन्हा काही कीवर्डद्वारे Google वर शोध घेतला. यावेळी आम्हाला फ्रेंच वेबसाइटच्या planetes360 या वेबसाईटवर प्रोफेसर ल्यूक मॉन्टॅग्निअर यांची संपूर्ण मुलाखत आढळून आली. यात त्यांना , “लसीकरणामुळे कोरोना साथीचा रोग थांबवू लागला आहे, ही संपूर्ण लसीकरण मोहीम तुम्हाला कशी दिसते? ही लस उपचारापेक्षा खूपच स्वस्त आहे आणि ती त्वरीत कार्य करते, आपणास याबद्दल काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला, यावर या प्रोफेसर ल्यूक मॉन्टॅग्निअरला म्हटले की, “ही एक वैज्ञानिकमेडिकल चूक आहे जी स्वीकारली जाऊ शकत नाही. ही चूक इतिहासात दर्शविली जाईल.कोरोनाचे नवे व्हेरिएंट्स निर्मण होण्यास लसीकरण हेच एक महत्त्वाचे कारण आहे.”
ते पुढे नवीन रूपे तयार करण्याच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण देतात, “लस नवीन अॅंटीबाॅडी बनवते. जी विषाणूला मरण्यास भाग पाडते किंवा दुसरा मार्ग शोधण्यास भाग पाडते. त्याचप्रमाणे, त्यांना दुसरा मार्ग सापडतो आणि नवीन व्हेरिएंट तयार करतात. हे सर्व नवीन प्रकार लसीकरणाचा परिणाम आहेत. ” या मुलाखतीत त्यांनी असे अनेक धक्कादायक दावे केले आहेत पण दोन वर्षात मृत्यू होणार असल्याचा दावा केलेला नाही. लोकसत्ताच्या वेबसाईटवर देखील आम्हाला बातमी आढळून आली, मात्र यात देखील व्हायरल दावा आढळूनआला नही.
पडताळणीदरम्यान आम्हाला पीआयबीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्हायरल क्लेमशी संबंधित ट्विटदेखील आढळले. हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे पीआयबीने ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, “फ्रान्सचे प्रोफेसर ल्यूक मॉन्टॅग्निअर यांनी केलेला दावा खोटा आहे.” लस पूर्णपणे सुरक्षित आहे.’
वादग्रस्त आहेत प्रोफेसर ल्यूक मॉन्टॅग्निअर
एचआयव्हीचा शोध लागल्यानंतर 12 वर्षांपूर्वी प्राध्यापक ल्यूक मॉन्टॅग्निअर यांना 2008 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. विशेष म्हणजे, प्रोफेसर ल्यूक मॉन्टॅग्निअर हे अत्यंत वादग्रस्त होते. नोबेल पारितोषिकाच्या नामांकनावेळीही मोठा वाद झाला होता. त्यांच्यावर रिसर्चची चोरी आणि विश्वासघात केल्याचा आरोप होता.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आहे. प्रोफेसर ल्यूक माँटॅग्निअर यांनी लस घेणारे लोक दोन वर्षात मरणार असल्याचा दावा केलेला नाही.
Read More : कर्नाटकात पुजा-यांनी सरकारी कर्मचा-यांना दानपेटीतील पैसे काढण्यास विरोध केला?
Claim Review: कोरोनाची लस घेणा-यांचा दोन वर्षात मृत्यू होणार Claimed By: Viral Post Fact Check: False |
Planetes360 – https://planetes360.fr/pr-luc-montagnier-les-variants-viennent-des-vaccinations/
Rairfoundation –https://rairfoundation.com/bombshell-nobel-prize-winner-reveals-covid-vaccine-is-creating-variants/
PIB –https://twitter.com/PIBFactCheck/status/1397156705918537729
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.