काॅंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याचे ट्विट केले असल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यात सिंह यांच्या हिंदीतील ट्विटचा स्क्रिनशाॅट शेअर करण्यात आला आहे. ट्विटमध्ये करोना वैक्सीन लगाने से प्रजनन शक्ती कम होगी… दिग्विजय सिंह असे लिहिले आहे.

Fact Checking/Verification
भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर अनेक लोक यावर प्रश्न विचारू लागते आहेत. विरोध पक्षातील अनेक नेत्यांनी देखील लसीच्या मंजुरीविषयी शंका व्यक्त करत आपली मते मांडली आहेत. समाजादी पार्टीचे नेते युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपची ही राजकीय लस टोचून घेणार नसल्याचे म्हटले आहे तर काॅंग्रेसचे नेते शशी थरुर यांनी या लसीची तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली नसताना मंजुरी कशी मिळाली नसल्याने तिचा वापर धोकादायक ठरु शकतो असे म्हटले आहे. अशातच दिग्विजय सिंह यांचे ट्विट व्हायरल झाले आहे. सिंह यांनी खरंच असे ट्विट केले आहे का किंवा असे वक्तव्य केले आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांनी दोन जानेवारीला एकच ट्विट केल्याचे त्यांच्या ट्विटर हॅंडलवर आढळून आले.
दिग्विजय सिंह यांनी कोरोना लसीविषयी केलेल्या वक्तव्यांचा देखील शोध घेतला असता आम्हाला त्यांची लसीबदद्लची अनेक वक्तव्ये आढळली मात्र यात कुठेही प्रजनन शक्ती कमी होत असल्याचे वक्तव्य आढळन आले नाही.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, काॅंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी कोरोना लस घेतल्याने नपुंसकत्व येत असल्याचे वक्तव्य किंवा ट्विट केलेले नाही.
Result: False
Our Sources
Hindustan Times– https://www.youtube.com/watch?v=p72JkzTJ5u0
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.