Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
महाराष्ट्र सरकारने 31 जुलैपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्यासा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत नवे 11 आवश्यक नियम लागू करण्यात आले आहेत.
सोशल मीडियात या दाव्याने एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात म्हटले आहे 1 जुलै पासून 31 जुलैपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्यात आला असून याच दरम्यान मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने 11 नवे आवश्यक नियम लागू करण्यात आले आहे. या व्हायरल मॅसेजची पडताळणी करण्याची विनंती आमच्या एका वाचकाने केली.

व्हायरल संदेशात काय म्हटले आहे?
व्हायरल संदेशामध्ये कोणते नवीन 11 अत्यावश्यक नियम लागू करण्यात आले आहेत याची माहिती देण्यात आली आहे.
2. कोणतीही आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ एका व्यक्तीस घराबाहेब बाहेर जाण्याची परवानगी आहे .. एकापेक्षा जास्त असल्यास अटक केली जाईल
3. खरेदीसाठी बाहेर जाताना आपला पत्ता पुरावा दस्तऐवज आपल्याकडे ठेवणे सुनिश्चित करा
आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सारखे
4. जर दुकान 2 किमी च्या आसपास असेल तर चालत जावे.
5. जर एखादी व्यक्ती आवश्यक वस्तू खरेदीसाठी वाहन वापरताना आढळली तर ते वाहन जप्त केले जाईल (सरकार आपल्याला फक्त जवळपासच्या दुकानांतून खरेदी करू देऊ इच्छिते)
6. अनावश्यकपणे बाहेर जाण्यास परवानगी नाही.
7. आपण जवळपासच्या स्टोअरमधून वस्तूंची मागणी करत असल्यास आणि ती घरी पोचत असेल
कृपया डिलिव्हरी मुलाला स्वतःचे हेल्मेटची मूळ कागदपत्रे ठेवण्यास सांगा.
8. एखाद्या दुकानातून उत्पादने खरेदी करताना दुसर्या व्यक्तीकडून पाच फुटाचे अंतर पाळले पाहिजे. जर त्याचे उल्लंघन केले गेले तर त्याला पकडले जाईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.
9. सोसायटी आणि जवळपासच्या परिसरात देखील फिरण्याची परवानगी नाही.
10. जर तुमचे वाहनबाहेर फिरत असताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले तर तुम्हाला उल्लंघन केल्यामुळे ताब्यात घेतले जाईल.
11. जर ज्येष्ठ नागरिक मुंबईत एकटे राहत असतील त्यांनी 18002002122 या मुंबई पोलिसांच्या क्रमांकावर संपर्क करावा.
पडताळणी
आम्ही व्हायरल संदेशाचे नेमके काय सत्य आहे याची पडताळणी सुरु केली असता. हा दावा फेसबुकवर देखील व्हायरल झाला असल्याचे आढळून आले.

महाराष्ट्रात 31 जुलै पर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आल्याच्या बातम्या आढळून आल्या मात्र या बातम्यांमध्ये कुठेही नवीन 11 आवश्यक नियमांचा उल्लेख नसल्याचे समोर आले.

अधिक शोध घेतला असता मुंबई पोलिसांचे 29 जून रोजीचे ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की, आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो कि, सोबत दिलेली मार्गदर्शक तत्वे मुंबई पोलीस कडून पारित झालेली नाहीत. विनंती करतो कि, अशा आशयाचे संदेशावर विश्वास ठेऊ नका तसेच ते आपले कुटुंबीय किंवा मित्रांमध्ये पाठवू नका. अधिकृत सूत्रांकडून प्राप्त माहितीवर विश्वास ठेवा.
यावरुन हेच स्पष्ट होते की, महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लाॅकडाऊन वाढविल्यानंतर नवे 11 आवश्यक नियम लागू करण्यात आलेले नाहीत. सोशल मीडियात चुकीची पोस्ट व्हायरल होत आहे.
Source
Result– False