Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeCoronavirusव्हायरल व्हिडिओ ब्रीच कॅंडी हाॅस्पिटलमधील डाॅक्टरचा नाही, जाणून घ्या सत्य

व्हायरल व्हिडिओ ब्रीच कॅंडी हाॅस्पिटलमधील डाॅक्टरचा नाही, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

दावा-

ब्रीच कॅंडी रुग्णालयातील डाॅ. शरद उदवाडिया यांचा कोरोना विषयी माहिती देतानाचा व्हिडिओ व्हायरल.

सोशल मीडियामध्ये सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक डाॅक्टर समोर उपस्थित असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसबद्दल माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडिओत डाॅक्टर करोनाचा रुग्ण तीन सेंकदांपेक्षा श्वास रोखून धरु शकत नाही, त्यामुळे रुग्ण कसा ओळखायचा आणि यासाठी कोणते घरगुती उपाय करायचे याची माहिती देत असल्याचे दिसते. दावा करण्यात येत आहे की हे ब्रीच कॅंडी रुग्णालयात कार्यरत असणारे डाॅ. शरद उदवाडिया आहेत.

पडताळणी- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता फेसबुकवर याच दाव्याने हा व्हिडिओ ब-याच प्रमाणात व्हायरल झाल्याचे आढळून आले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1163732814000908&id=100010926019171

संग्रहित

फेसबुक/संग्रहित

या व्हायरल व्हिडिओविषयी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये माहिती आढळून आली नाही. त्यामुळे आम्ही व्हिडिओ बारकाईने पाहिला असता या व्हिडिओत एक डाॅक्टर कॅबिनमध्ये रग्णांना कोरोनाबद्दल माहिती देताना दिसत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार साधारण व्यक्ती साधरणपणे 40 ते 60 सेकंदांपर्यंत श्वास रोखू शकतो. कोरोनाचा रुग्ण मात्र तीन सेकंदही श्वास नाही रोखू शकत. त्यामुळे जर आपण रोज दोन वेळा श्वास रोखून पाहायचे की, श्वास रोखून धरण्याची आपली वेळ कमी तर होत नाही ना.

आम्ही मुंबईतील ब्रीच कॅंडी हाॅस्पिटलमध्ये डाॅ. शरद उदवाडिया नावाचे डाॅक्टर आहेत का याचा शोध घेण्यासाठी रुग्णालयाच्या वेबसाईटला भेट दिली. यादीत डाॅ. झहीर उदवाडिया आणि फारुख उदवाडिया ही नावे आढळली मात्र शरद उदवाडिया हे नाव आढळले नाही. रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी शरद उदवाडिया नावाचे डाॅक्टर नसल्याचे सांगितले. डॉ. झहीर उदवाडिया हे राज्याच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य आहे शिवाय  जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) निगडित आहेत. मात्र त्यांनी असे कोणताही दावा किंवा उपाय सांगितलेला नाही. आपण त्यांची मुलाखत पाहू शकता.

 व्हायरल व्हिडिओतील डाॅक्टर जे उपाय सांगत आहेत ते देखील चुकीचे असल्याचे आढळून आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार अशा प्रकारे श्वास रोखून चाचणी करणे चुकीचे आहे. लॅबमध्येच चाचणी करणे योग्य आहे.

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीचा ब्रीच कॅंडी हाॅस्पिटलशी संबंध नाही, ती व्यक्ती नेमकी कोण आहे याबद्दल माहिती मिळालेली नाही. शिवाय त्या व्यक्तीने व्हिडिओत केलेले दावे चुकीचे असल्याचे देखील आढळून आले.

Source

Facebook, Google, Youtube

Result– False

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular