एक एप्रिलपासून सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत धावणार असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सोशल मीडियात शेअर होत असलेल्या पोस्टमध्ये तसेच काही न्यूज आर्टिकलमध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाच्या संकटामुळे भारतीय रेल्वेने सर्व गाड्यांची वाहतूक बंद केली होती, पण परिस्थिती नियंत्रणात येताच रेल्वेने लोकांना विशेष दिलासा देत काही विशेष रेल्वे गाड्या चालवण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत, भारत कोरोनावर बर्याच प्रमाणात नियंत्रित करू शकला आहे, म्हणून आता पूर्वीसारख्या सर्व सेवा पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय रेल्वे 1 एप्रिलपासून सर्व गाड्या चालविण्याचा विचार करीत आहे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Fact Check / Verification
याबाबत आम्ही पडताळणी सुुरू केली असता आम्हाला इंडिया टीव्हीची ची एक बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की 65 टक्के रेल्वेगाड्या सुरळीत धावत आहेत. रेल्वेचा एक एप्रिल पासून सर्व रेल्वेगाड्या पूर्ववत करण्याचा कोणताही विचार नाही.

आम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली पण अशी कोणतीही माहिती आढळली नाही. मात्र पीआयबीच्या वेबसाइटवर 13 फेब्रुवारी 2021 रोजीच्या एका प्रसिद्धीपत्रात आम्हाला याबाबत स्पष्टीकरण आढळून आले.
यात म्हटले आहे की, “एप्रिलपासून प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत माध्यमांमध्ये अनेक मालिकांमधून बातम्या येत आहेत. याबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांना सातत्याने स्पष्टीकरण दिले जात आहे. सर्व प्रवाशी गाड्यांचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी अशी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, असा पुनरुच्चार केला जात आहे.”

याबाबत आम्हाला पीआयीबीचे ट्विट देखील आढळून आले. यात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेचे सर्व रेल्वेगाड्या 1 एप्रिलपासून सुरु होणार असल्याचे वृत्त निराधार आहे. रेल्वेने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
Conclusion
यावरुन हे स्पष्ट होते की, 1 एप्रिलपासून सर्व रेल्वेगाडया पूर्ववत धावणार असल्याचे वृत्त निराधार आहे. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल होत आहे.
Result- False
Our Sources
India Tv– https://www.indiatvnews.com/news/india/65-percent-trains-back-on-track-no-plans-to-resume-normal-services-by-april-1-indian-railways-684972
PIB- https://twitter.com/PIBFactCheck/status/1360621243326631938
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.