एफबीआयने अटक केलेल्या बोस्टन विद्यापीठामधील प्राध्यापकाचा कोरोनाशी संबध असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, हा प्राध्यापक वुहानमधील चिनी विद्यापीठ आणि संशोधन प्रयोगशाळेच्या संदर्भात होता आणि त्याला चीनने जबरदस्त पैसे दिले होते. यावरुन आता हे स्पष्ट झाले आहे की, कोरोना व्हायरस हा नियोजित जैविक हल्ला होता आणि तो चीनने आयोजित केला होता. पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, गरम पाण्याने नाकात इनहेलेशेन केल्यास कोराना नष्ट होतो असे एका चीनच्या विशेषज्ञाने सांगितले आहे.

पडताळणी
एफबीआयने बोस्टन विद्यापीठातील प्रोफसरला कोरोना पसरवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे का याची पडताळणी सुरु केली असता फेसबुकवर याच दाव्याच्या काही पोस्ट आढळून आल्या.


आम्ही या संदर्भात अधिक तपास केला असता एप्रिल महिन्यातील एक ट्विट आढळून आले. ज्यात बोस्टन विद्यापीठातील प्रोफेसरला अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे.
आम्ही ट्विटमधील व्हिडिओ इनव्हिडच्या माध्यमातून शोधला असता. हा व्हिडिओ एका यूट्यब चॅनलवर आढळून आला.
या व्हिडिओतून समझले की प्रोफेरसर चे चार्ल्स लीबर आहे. त्यावेळी ते हार्वर्ड विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाचे प्रमुख होते. 28 जानेवारी 2020 हाॅर्वर्डमधील त्यांच्या आॅफिसमधून त्यांना अटक करण्यात आली होती.त्यांच्यावर चीनमधील वुहान विद्यापीठाकडून महिन्याकाठी 35 लाख रुपये घेतल्याचा आरोप होता. चीनमध्ये रिसर्च लॅब तयार करण्यासाठी त्यांना 7.5 कोटींचा निधी मिळाला होता. शिवाय ते अमेरिकेच्या संरक्षण विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य विभागाकडून देखील अनुदान घेत होते. याप्रकरणी दोन चिनी प्रोफेसरांना देखील अटक करण्यात आली. यांच्यावर बायोलाॅजिकल रिसर्चच्या फाईल्स चीनमध्ये पोहविणे आणि अमेरिकन एजेंसीलाच्या तपासात खोटे बोलल्याचा आरोप होता. लीबर यांच्यावरील आरोप खरे ठरले तर त्यांना पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र या पूर्ण व्हिडिओत कुठेही कोविड-19 चा उल्लेख नव्हता.
दी गार्डियन या वृत्तपत्राने देखील हार्वर्डच्या प्रोफेसरला चीनशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक केल्याचे वृत्त दिले होते मात्र यात कुठेही कोविड-19चा उल्लेख नाही.

न्युयाॅर्क टाईम्स देखील चीनकडून मिळणा-या निधीबाबत माहिती लपविल्यामुळे हाॅर्वर्डच्या प्रोफेसरला अटक करण्यात आल्याची बातमी दिली होती. मात्र यातही कोरोनाव्हायरस किंवा कोविड-19 चा उल्लेख नव्हता.

यावरुन हेच सिद्ध होते की एफआयने हाॅर्वर्ड विदयापीठातील प्रोफेसरला चिनी फंडिंगबद्दल माहिती लपविल्याबद्दल जानेवारी 2020 मध्ये अटक केली होती, कोरोनाचा यात कसलाही उल्लेख नाही. सोशल मीडियात प्रोफेसरच्या अटकेची पोस्ट चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Source
- Sharechat
- Invid
Result– Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)