Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeCoronavirusकोरोना रुग्णामागे दीड लाख मिळत असल्याची अफवा, जाणून घ्या सत्य

कोरोना रुग्णामागे दीड लाख मिळत असल्याची अफवा, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

महापालिका आणि नगरपालिकांना प्रत्येक कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये मिळत असल्याची सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यात म्हटले आहे की, प्रत्येक कोरोना रुग्णामध्ये दीड लाख रुपये खर्च देण्यात येईल म्हणून नगरपालिका आणि महानगरपालिका असे केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आलेले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, पॅथोल्याब आणि प्रायव्हेट डॉक्टर्स हे सर्व मिळून कोरोना रुग्णांची संख्या जास्ती जास्त कशी वाढवता येईल या प्रयत्नात आहेत. व त्यानुसार शोध घेत आहेत.

सामान्य माणसाला ताप किंवा खोकला झाला…. की त्याला कोरोना पॉझिटीव्ह घोषित करत आहेत. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीमागे दीड लाख कमवता येतील. केंद्र सरकार कडून हा प्लॅन सध्या पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात सुरू झाला आहे. तर अशा प्रकारे त्या सर्वांचा प्रयत्न हाणून पाडा… ‘ कोरोणा’ हा आता कोणताही आजार राहिलेला नसून तो आता मेडिकल इंडस्ट्री चा धंदा झाला आहे. आमच्या एका वाचकाने आम्हाला व्हाट्सअॅप्प वर व्हायरल होत असलेली पोस्ट पडताळणीसाठी आमच्याकडे पाठवली.

पडताळणीसाठी पाठलिलेला व्हाट्सअप्प संदेश

Fact Check / Verification

आम्ही केंद्र सरकार खरंच प्रत्येक कोरोना रुग्णामागे महापालिका आणि नगरपालिकांना दीड लाख रुपये देत आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही किवर्डसच्या आधारे गूगलमध्ये शोध घेतला असता फेसबुकवर एक पोस्ट आढळून आली. यात असाच दावा करण्यात आला होता.

फेसबुक/ संग्रहित

या व्हायरल दाव्याविषयी आम्ही अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला केंद्र सरकारने अशी घोषणा केल्याची बातमी आढळून आली नाही. किंवा अशा प्रकारची बातमी आढळून आली नाही.

याबाबत पुढे शोध सुरुच ठेवला असता राजतंत्र.काॅम या वेबसाईटवर एक बातमी आढळून आली. यात पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. कैलास शिंदे यांनी या व्हायरल पोस्टबाबत स्पष्टिकरण दिल्याचे म्हटले आहे. यात जिल्हाधिका-यांनी महापालिका व नगरपालिका यांना प्रत्येक कोरोना रुग्णामागे केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये मिळत असल्याची अफवा असल्याचे म्हटले आहे.

राजतंत्र.काॅमच्या बातमीचा स्क्रिनशाॅट

याशिवाय आम्हाला दिव्य मराठी मध्ये 25 जुलै रोजी प्रसिद्ध झालेली बातमी देखील आढळून आली. केंद्र सरकारकडून कोरोनाच्या प्रत्येक रुग्णामागे दीड लाख रुपये खर्च म्हणून मिळत असल्याचा अफवा पसरवणारा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असल्याचे या बातमीत म्हटले आहे.

loading...

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की केंद्र सरकारकडून प्रत्येक कोरोना रुग्णामागे महानगरपालिका किंवा नगरपालिका यांना दिड लाख रुपये मिळत नाहीत शिवाय पोस्टमध्ये केलेले इतर दाव्यांमध्ये देखील तथ्य नाही. सोशल मीडियात अफवा व्हायरल झाली आहे.

Result: False

Our Sources

Bhaskar: https://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/divya-city/243/25072020/0/3/

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular