पुद्दुचेरी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा कोरोनावरील घरगुती उपाय WHO ने स्वीकारला असल्याच्या दाव्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यात म्हटले आहे की, एक चांगली बातमी आहे अखेर पाॅंडिचेरी विद्यापीठातील विद्यार्थी रामूला कोविड-19चा घरगुती उपचार सापडला आहे, त्याला WHO ( जागतिक आरोग्य संघटना) ने प्रथमच मान्यता दिली आहे.

Fact Check/Verification
आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली असता हा मॅसेज याआधी देखील फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल झाल्याचे आढळून आले.
यानंतर आम्ही गूगलमध्ये शोध घेतला असता जागतिक आरोग्य संघटनने भारतीय विद्यार्थ्याच्या कोरोनावरील घरगुती उपायाला मान्यता दिल्याची बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही संघटनेच्या वेबसाईटला भेट दिली मात्र तिथे देखील अशा कोणत्या घरगुती उपायाला मान्यता दिल्याचा उल्लेख आढळून आला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने अनेक अफवांचे खंडन केलेले आहे. यापैकीच एक मिरपुडाच्या उपायाबद्दल त्यांनी म्हटले आहे की सूप किंवा जेवणात मिरपूड घातल्याने कोरोना नष्ट होऊ शकत नाही.

Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, कोरोना संदर्भात भारतीय विद्यार्थ्याच्या घरगुती उपायाला जागतिक आरोग्य संघटनने मान्यता दिलेली नाही. सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल झाला आहे.
Result- False
Sources
WHO- https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/advice-for-public/myth-busters
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.