चीन मध्ये प्रचंड पावसामुळे तीन धरणे फुटून महापूर आला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. यात अनेक कार वाहून जाताना दिसत आहेत याच प्रचंड नुकसान झाल्याचे दिसते. दावा करण्यात येत आहे की, अमानवीय कृत्य करुन अति स्वस्वार्थी महत्वाकांक्षेपोटी संपुर्ण जगाला भिकेला लावून स्वत:ला महासत्ता बनविणा-या चीनला नियतीने असा धडा दिला.
Fact Check / Verification
व्हायरल व्हिडिओ नेमका चीनमध्ये आलेला महापुराचा आहे का याची पडताळणी करण्याचे आम्ही ठरविले. यासाठी काही किवर्ड्सच्या आधारे शोध सुरु केला. या शोधा दरम्यान आम्हाला आणखी काही फेसबुक पोस्ट आढळून आल्या ज्याता वरील व्हिडिओ याच दाव्याने शेअर करण्यात आला आहे.

या व्हायरल व्हिडिओतील काही किफ्रेम्सचा वापर करुन आम्हील रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने या व्हिडिओबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ 2011 मध्ये जपानमध्य त्सुनामीचा असल्याचे एका यूट्यूूब चॅनलच्या व्हिडिओवरुन लक्षात आले.
2011 पासून हा व्हिडिओ विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
11 मार्च, 2011 रोजी, 9 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने ईशान्य जपानला हादरा दिला. नॉर्वेच्या फजर्ड्सपासून अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या चादरीपर्यंत, या मोठ्या भूकंपाचा परिणाम जगभर जाणवला.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ हा 2020 मध्ये चीनमध्ये धरणे फूटून आलेल्या महापूराचा नसून जपानमध्ये 2011 मध्य आलेल्या त्सुनामीचा आहे. हा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Result- Misleading
Sources
livescience- https://www.livescience.com/39110-japan-2011-earthquake-tsunami-facts.html
YouTube- https://www.youtube.com/watch?v=yIML104Q-zM