Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeCoronavirusबेरोजगार झाल्यामुळे अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ आली नाही, चुकीचा दावा व्हायरल

बेरोजगार झाल्यामुळे अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ आली नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

आमिर खानचा सहकलाकार जावेद हैदरवर बेरोजगारीमुळे लाॅकडाऊनमध्ये भाजी विकण्याची वेळ आली आहे.

असा दावा करण्या-या बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यात म्हटले आहे की लाॅकडाऊन मुळे फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. इतर कलाकारांप्रमाणे जावेद हैदरलादेखील काम नसल्याने भाजी विकून पोट भरावे लागत आहे. या व्हिडिओत दुुनिया में रहना है तो काम कर प्यारे या गाण्याच्या तालावर गात व अभिनय करत हातगाड्यावर भाजी विकत असल्याचे दिसत आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटक-यांनी त्याला प्रोत्साहन दिले असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

पडताळणी-

आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. जावेद हैदरवर बेरोजगारीमुळे खरंच भाजी विकण्याची वेळ आली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे माहीत घेण्यास सुरुवात केली. आम्हाला यासंदर्भात अनेक बातम्या आढळून आल्या.

मुंबई लाईव्ह नावाच्या वेबसाईटवर ही बातमी आढळून आली. यात हाच दावा करण्यात आला आहे की इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार व बॅक स्टेज आर्टिस्ट बेरोजगार झाले आहे. जावेद हैदर देखील बेरोजगार झाला असल्याने त्याने भाजी विकण्यास सुरुवात केली आहे.

संग्रहित

याशिवाय दैनिक सकाळने देखील जावेद हैदर भाजी विकत असल्याची बातमी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. यात म्हटले आहे की, आमीर खानच्या गुलाम चित्रपटात काम केलेला कलाकार जावेद हैदरला घर चालवण्यासाठी भाजी विकावी लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

संग्रहित

लोकसत्ताच्या वेबसाईटवर देखील ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. यात देखील हैदर बेरोजगारीमुळे भाजी विकत असल्याचे म्हटले आहे.

संग्रहित

आम्हाला अभिनेत्री डाॅली बिंद्रा हिने जावेद हैदरचा भाजी विकतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केल्याचे आढळून आले. जावेद ने हा व्हिडिओ टिकटाॅकवर अपलोड केला होता तोच व्हिडिओ डाॅलीने शेअर केला आहे.

संग्रहित

आम्ही फेसबुकवर देखील हैदर पोट भरण्यासाठी भाजी विकत असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.

फेसबुक

अधिक शोध सुरु ठेवला असता 29 जून रोजी मुंबई मिररच्या वेबसाईटवर जावेद हैदरची मुलाखत प्रसिद्ध झाल्याचे आढळून आले. यात त्याने यासंदर्भात खुलासा करताना सांगितले आहे की, मी भाजी विक्रेता नाही आजही मी व्यवसायाने अभिनेता आहे. मी भाजी विकत असल्याचा अभिनय केला आणि तो व्हिडिओ टिकटाॅवरील माझ्या फाॅलोवर्सना प्रेरणा देण्यासाठी अपलोड केला. मला यामाध्यमातून हेच सांगायचे होते की, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. डाॅली बिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला मात्र मी त्यावर हा फक्त अभिनय होता अशी कमेंट केली मात्र लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो व्हिडिओ वेगळ्या दाव्याने व्हायरल झाला.

यावरुन हेच स्पष्ट होते की जावेद हैदर या अभिनेत्यावर बेरोजगारीमुळे भाजी विकण्याची वेळ आलेली नव्हती तर त्याने भाजी विकण्याचा अभिनय केला होता. तोच व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला.

Source

Google Search

Facebook

Twitter

Result– Misleading

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular