Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeCoronavirusमहाराष्ट्रातील कोरोना पेशंटचा नाही व्हायरल व्हिडिओ, जाणून घ्या सत्य 

महाराष्ट्रातील कोरोना पेशंटचा नाही व्हायरल व्हिडिओ, जाणून घ्या सत्य 

Authors

Claim

अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंट दाखल झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दाव्याचे संक्षिप्त विवरण-
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.याच दरम्यान   सोशल मीडियामध्ये कोरोना पेशंटला हाॅस्पिटल मध्ये दाखल केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे का हा व्हिडिओ अहमदनगरमधील सिव्हिल हाॅस्पिटलचा आहे.
Verification
आम्ही या व्हिडिओची सत्यता तपासून पाहण्याचे ठरविले. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता सार्वमत या दैनिकाच्या  वेबसाईटवर नगरमध्ये एक कोरोना पेशंट आढळल्याची बातमी मिळाली.  पेशंटला जिल्हा रुग्णालयात दाखले केले असून त्याची प्रकृति स्थिर असल्याचे म्हटले आहे.
मात्र आम्हाला या बातमीत व्हायरल पोस्टमधील हाॅस्पिटलचा किंवा पेशंटचा फोटो अथवा  व्हिडिओ आढळून आला नाही. त्यामुळे आम्ही शोध सुरुच ठेवला असता हा व्हिडिओ परभणी सिव्हिल हाॅस्पिटलच्या नावाने देखील फेसबुवर शेअर होत असल्याचे आढळून आले.
यूट्यूबवर देखील हा व्हिडिओ परभणीच्या नावाने व्हायरल झाल्याचे आढळून आले.
यानंतर व्हिडिओ बारकाईने पाहिला असता एका कर्मचा-याच्या यूनिफाॅर्मवर जिला चिकित्सालय झाबुआ म. प्र असे लिहिल्याचे आढळून आले.
आम्ही झाबुआ आणि इतर काही किवर्ड्सच्या आधारे गूगलमध्ये शोध घेतला असता सी बी लाईव्ह नावाच्या यूट्यूब चॅनलवर  हा व्हिडिओ मिळाला. यात म्हटले आहे की, मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्हा हाॅस्पिटल आणि त्यांचा आरोग्य विभाग कोरोनाचा सामना करण्यासाठी किती तत्पर आहे याचा माॅक ड्रिल द्वारे सराव जिल्हाधिका-यांच्या निर्देशानुसार करण्यात आला.
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील अहमदनगर किंवा परभणीचा नसून तो मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्हा रुग्णालयातील कोरोना च्या माॅक ड्रिलचा आहे. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Source  

Facebook Search
Google Keyword Search
YouTube
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular