दावा– सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनामुळे धर्मावरील आस्था कमी झाली आहे असे म्हटले.
सोशल मीडियाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदी वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. या बातमीत मोहन भागवत यांनी कोरोनामुळे माझी धर्मावरील आस्था कमी झाली असल्याचे व धार्मिक स्थळे किंवा शाळा यापेक्षा डाॅक्टर आणि रुग्णालये महत्वाची असल्याचे वक्तव्य केले आहे असे म्हटले आहे.
पडताळणी- आम्ही यासंदर्भात पडताळणी सुरु केली. काही किवर्डसच्या आधारे गूगलमध्ये शोध घेतला असता फेसबुकवर याच दाव्याच्या पोस्ट आढळून आल्या.


आम्ही या संदर्भात अधिक तपास केला असता गूगलमध्ये मोहन भागवत यांच्या संदर्भातील अशी बातमी आढळून आली नाही. त्यानंतर आम्ही सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले बातमीचे कात्रण बारकाईने पाहिले असता यात अनेक त्रुटी दिसून आल्या. यात बातमीच्या शीर्षकामधील शब्दांमध्ये गॅप आहे जो वृत्तपत्राच्या बातमीत नसतो. शीर्षकाशिवाय बातमीमध्ये एकदाही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा उल्लेख नाही. शिवाय भागवत यांचा फोटो चिकटवल्यासारखा दिसतो.

पडताळणी दरम्यान आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार यांचे 19 मे रोजीचे ट्विट मिळाले. यात त्यांनी म्हटले आहे की, मोहन भागवत यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फेक न्यूज व्हायरल होत आहे. त्यांनी असे कोणेतही वक्तव्य केलेले नाही.
यावरुन हेच स्पष्ट होते की सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मावरील आस्था कमी झाल्याचे वक्तव्य केलेले नाही. सोशल मीडियात बातमीचे बनावट कात्रण व्हायरल झाले आहे.
Source
Facebook Twitter
Result- Fabricated News/ False content
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)