Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeCoronavirusव्हायरल व्हिडिओ मुंबई सेंट्रल परिसरात पॅरा मिलिटरी फोर्स दाखल झाल्याचा नाही, वाचा...

व्हायरल व्हिडिओ मुंबई सेंट्रल परिसरात पॅरा मिलिटरी फोर्स दाखल झाल्याचा नाही, वाचा सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

दावा- व्हायरल व्हिडिओ मुंबई सेंट्रल परिसरात पॅरा मिलिटरी दाखल झाल्याचा आहे. 

सोशल मीडियात पॅरा मिलिटरी दाखल झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात चेह-यावर हेल्मेट आणि पारदर्शी मास्क लावललेले जवान येताना दिसत आहेत. तसेच लोक त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करतान दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबई सेंट्रल येथील असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

पडताळणी- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. मुंबईमध्ये पॅरा मिलिटरी दाखल झाली आहे का याबाबत काही किवर्डसच्या आधारे माहिती घेतली असता आम्हाला एक फेसबुक पोस्ट आढळून आली. 

https://www.facebook.com/106245767689084/videos/2313555538953511

अर्काइव्ह

याशिवाय यूट्यूबवर देखील याच दाव्याने हा व्हिडिओ अपलोड केल्याचे आढळून आले. 

https://www.youtube.com/watch?v=GK_Y8ljwfy8

आम्ही यासंदर्भात अधिक शोध घेतला असता  टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या बातमीचा 15 मे रोजीचा व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की पॅरा मिलिटरीच्या चार कंपन्या अमरावती, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे येथे दाखल झाल्या आहेत. लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी तसेच पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी या फोर्सला बोलवण्यात आले आहे. मात्र या बातमीत कुठेही मुंबईत फोर्स दाखल झाल्याची माहिती नाही. 

यानंतर आम्ही काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता पुण्यात पॅरा मिलिटरी फोर्स दाखल झाल्याची बातमी बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर आढळून आली. 

मात्र आम्हाला मुंबईच्या नावाने व्हायरल झालेला व्हिडिओ मात्र मुख्य मांध्यमांतील बातम्यांत आढळून आला नाही. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बारकाईने पाहिला असता यात सिटी हाॅस्पिटल आणि प्राईम मेडिकल स्टोअर दिसत असल्याचे आढळून आले. 

हे हाॅस्पिटल आणि मेडिकल नेमके कोणत्या शहरातील आहे यासाठी काही किवर्डसचा आधार घेत शोध घेतला असता हे हाॅस्पिटल आणि मेडिकल स्टोअर पुण्यातील कॅम्प परिसर आणि भवानी पेठेला जोडणा-या चौकातील असल्याचे आढळून आले. 

याशिवाय या व्हिडिओमधील दुचाक्यांचे नंबर हे एमएच- 12 म्हणजेच पुणे पासिंगचे असल्याचे आढळून आले.

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही पुण्यातील एका स्थानिक पत्रकाराशी संपर्क साधला असता त्याने हा व्हिडिओ पुण्यातील कॅम्प परिसरातील असल्याचे सांगितले. 
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ हा मुंबई सेंट्रल येथे लाॅकडाऊनदरम्यान पॅरा मिलिटरी दाखल झाल्याचा नसून तो पुणे शहरातील कॅम्प परिसरातील आहे.
Source
Whatsapp, Facebook, Youtube
Result- Misleading/partly False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular