Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeCoronavirusमालेगावातील युनानी काढ्याविषयी चुकीचा दावा व्हायरल, हे आहे सत्य

मालेगावातील युनानी काढ्याविषयी चुकीचा दावा व्हायरल, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

नाशिक जिल्हयातील मालेगावमध्ये युनानी काढ्याचा वापर केल्याने कोरोनाचे रुग्ण बरे झाले व नवीन एकही रुग्ण आढळलेला नाही असा दावा करणारी पोस्ट व्हायरल होत आहे. मालेगावातील युनानी काढ्याविषयी हा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला असून, राज्यातील इतर भागांतून हा काढा खरेदी करण्यासाठी लोकांची मालेगावमध्ये झुंबड उडाल्याच्या पोस्ट देखील शेअर होताहेत. आम्हाला असाच दावा करणारी पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफार्म शेअरचॅट वर आढळून आली. स्वस्तात तयार होणा-या या काढ्यासाठी लागणा-या सामग्रीची यादी यात देण्यात आली आहे व शेवची ताजा कलम मध्ये या काढ्याने मालेगावातील सर्व पेशंट बरे झाले असून नवीन पेशंट आढळत नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

पडताळणी

मालेगावात युनानी काढ्यामुळे खरंच रुग्ण बरे झाले आहेत का याविषयी माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. फेसबुकवर देखील ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

https://www.facebook.com/ajay.sonawani/posts/3106329959450873

संग्रहित

https://www.facebook.com/dhanraj.masal/posts/3057263371052676

संग्रहित

यावतिरिक्त काढ्यासदंर्भात काही माहिती मिळतेय का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता. आम्हाला महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, या काढ्याची लोकप्रियता वाढत असून मागणी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र याला लागणारी सामग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. बातमीत डाॅक्टर शेख मुक्तार यांची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या मन्सुरी काढ्याचा उपयोग होत आहे. बातमीत कुठेही या काढ्यामुळे कोरोनाचे रुग्ण ठणठणीत बरे झाल्याचा उल्लेख आढळलेला नाही.

याशिवाय दैनिक सकाळच्या वेबसाईटवर देखील या काढ्याची ग्रामीण भागात लोकप्रियता वाढल्याची माहिती देणारी बातमी आढळून आली. मात्र या बातमीत देखील याच काढ्यामुळे 100 टक्के रुग्ण बरे झाले किंवा नवीन रुग्ण आढळून आला नाही असा प्रकारचा कोणताही दावा केलेला नाही. मात्र रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा काढा लोक घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. बातमीत या काढ्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देखील दिल्याचे म्हटले आहे. मात्र आरोग्यमंत्र्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली याची माहिती या बातमीत दिलेली नाही.

याच शोधा दरम्यान आम्हाला Bhivandi Mirror या फेसबुक पेज वर एक व्हिडिओ आढळून आला ज्यात मालेगावचा काढा मोफत वाटला जात असल्याचे दिसत आहे. यात काढा देणारे डाॅक्टर जमील यांनी या काढ्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी देखील काढ्यामुळे कोरोनाचा रुग्ण 100 टक्के बरा होतो असा दावा केलेला नाही.

https://www.facebook.com/watch/?v=1403062416557245

मालेगावात कोरोना रुग्णांची सख्या नेमकी कशी कमी झाली याचा देखील आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता दैनिक सकाळची एक बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, मध्यंतरी मालेगाव कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले होते मात्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महापालिका व पोलिस यंत्रणेेने पूर्ण क्षमतेने नियोजन व अमंलबजावणी संसर्ग रोखण्यात यश मिळवले. त्यामुळे मालेगाव पॅटर्नची चर्चा राज्यभर झाली.

या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही मनपा आरोग्य अधिकारी डाॅ. सपना ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मालेगावात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर या काढ्याची चर्चा सुुरु झाली, या काढ्यामुळे रोगप्रतिकार शक्ति वाढू शकते पण रुग्ण 100 टक्के बरा होते असे अधिकृत पणे आढळले नाही. मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी दररोज नवे रुग्ण आढळत आहेत 8 जुलै रोजी शहरात 9 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल पोस्टमधील दावा चुकीचा आहे. मालेगावातील युनानी काढ्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते मात्र रुग्ण 100 टक्के बरे झाल्याचे उदाहरण समोर आलेले नाही, शिवाय मालेगावात नवीन एकही रुग्ण नाही हा दावा देखील खोटा असल्याचे पडताळणीत आढळून आले आहे.

Source

  • Sharechat
  • Facebook
  • Google

Result- False

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular