दावा-
‘शारीरिक अंतराचे पालन न करता बसमध्ये चढणा-या लोकांचा व्हिडिओ मुंबईतील आहे’.
सरकारने लाॅकडाऊनच्या ब-याचशा अटी शिथिल केल्या आहेत. काही ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीला देखील परवानगी देण्यात आलेली आहे. अशातच सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात बसमध्ये जागा मिळवण्यासाठी लोक चढाओढीने आत घुसत असल्याचे दिसत आहेत. दावा करण्यात येत आहे की, मुंबईत लोकांनी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शारीरिक अंतराचे पालन न करता अशा प्रकारे गर्दी केली.

पडताळणी
आम्ही बसमध्ये चढणा-या गर्दीचा व्हायरल व्हिडिओ मुंबईतीलच आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. फेसबुकवर याच दाव्याने अनेक पोस्टमध्ये हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्याचे आढळून आले.

याशिवाय ट्विटर आणि यूट्यूबवर देखील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आम्ही व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिला असता यात लोक जेव्हा बसमध्ये घुसत होते त्यावेळी कंडक्टरचा बंगाली भाषेत बोलत असल्याचे दिसून आले. तो आरामात आरामात या असे बंगाली भाषेत बोलत आहे. यावरुन हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील असण्याची शक्यता निर्माण झाली. अधिक तपास केला असता आम्हाला 8 जून रोजीचे एक टविट आढळून आले. ज्यात लोक बसचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 36 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये 17 व्या सेकंदाला कंडक्टर बंगाली भाषेत बस टिटागडला जाईल पोलिस स्टेशन पर्यंत असे म्हणत असल्याचे एेकून येते. टिटागड हे कोलकाताजवळचे ठिकाण आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की शारीरिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन करत बसमध्ये चढणा-या लोकांचा व्हिडिओ मुंबईतील नसून कोलकाता येथील आहे.
Source
Facebook Search, Twitter Advanced Search, Google Search
Result– Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)