Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeCoronavirusव्हायरल व्हिडिओ दहा महिन्यानंतर मुंबई लोकल सुरु झाल्यानंतर बोरिवली स्थानकात तुफान गर्दी...

व्हायरल व्हिडिओ दहा महिन्यानंतर मुंबई लोकल सुरु झाल्यानंतर बोरिवली स्थानकात तुफान गर्दी झाल्याचा नाही

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

दहा महिन्यानंतर मुंबई लोकल सुरु झाल्यानंतर बोरिवली स्थानकात तुफान गर्दी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे की, मुंबई लोकल सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशी बोरिवली रेल्वे स्थानकात अशी तुफान गर्दी झाली. कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे 23 मार्च 2020 रोजी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेचे कामकाज स्थगित करण्यात आले आणि 15 जुलै 2020 पासून काही विशिष्ट गटांसाठी ते पुन्हा सुरू झाले. यानंतर 1 फेब्रुवारी 2021 पासून सर्वसामान्यासाठी ठराविक वेळेत उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशातच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

संग्रहित

Fact Check / Verification

उपनगरीय रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे, परंतु या व्हिडिओमुळे नेटिझन्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण मुंबईत डिसेंबर 2020 च्या तुलनेत जानेवारी 2021 मध्ये कोविडची रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आम्ही या व्हिडिओचे नेमके काय सत्य आहे याची पडताळणी सुरु केली.

InVID च्या साहाय्याने आम्ही काही किवर्डसच्या मदतीने शोध शुरु केला असता आम्हाला पाच वर्षांपूर्वीचा म्हणजे 12 मार्च 2016 रोजी एका यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला हा व्हिडिओ आढळून आला.

अधिक माहितीसाठी आम्ही शोध पुढेच सुरु ठेवला असता आम्हाला इंडिया टुडेचा या संदर्भातील लेख आढळून आला. ज्यात पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी म्हटले आहे की, बोरिवली स्थानकात 1 फेब्रुवारी रोजी अशी परिस्थिती नव्हती. 1 फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेने सुमारे 12.4 लाख लोकांनी प्रवास केला ज्यावर बोरिवली आहे, तर कोरोना आधी दररोज सरासरी 35 लाख लोक या मार्गावरून प्रवास करीत असत. हा एक जुना व्हिडिओ आहे जो सोशल मीडियात खोटी दाव्यांसह व्हायरल होत आहे.

याशिवाय आम्हाला पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल डिव्हिजनच्या अधिकृत हँडल वर एक ट्विट देखील आढळले ज्यामध्ये मह्टले आहे की, गर्दीचे नियमन करण्यासाठी मुंबईच्या उपनगरी भागात सुरक्षा दले तैनात केली आहेत आणि कोणत्याही विभागातून कोणतीही मोठी गर्दी असल्याची माहिती मिळलाेली नाही.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ लोकल ट्रेन दहा महिन्यानंतर पुन्हा सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारी रोजी सुरु झाल्याच्या दिवशीचा नाही तर पाच वर्षांपुर्वीचा आहे.

Result – Misleading

Our Sources

युट्यूब- https://www.youtube.com/watch?v=m5CSDX12rSs

पश्चिम रेल्वे- https://twitter.com/rpfwrbct/status/1356512613673275392

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular