Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Explainer
डोळे येण्याची साथ सध्या सर्वत्र काळजीचा विषय बनला आहे. वैद्यकीय भाषेत या आजाराला आय फ्लू किंवा कंजक्टिव्हायटीज (Conjunctivitis) असे सुद्धा म्हणतात. या आजाराला पिंक आय असेही संबोधले जाते. ही साथ आली आणि अनेकांचे डोळे गुलाबी आणि लाल होऊ लागले आहेत. डोळे चुरचुरत असतानाच या विषयावरील अनेक पोस्ट अनेकांचे डोळे दुखवून टाकत आहेत. दरम्यान हा आजार काय आहे, काळजी काय घ्यायची आणि औषधोपचार कसे केले जातात याबद्दल आपण या एक्सप्लेनर च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
आय फ्लू, पिंक आय किंवा कंजक्टिव्हायटीज (Conjunctivitis) हा आजार नेमका काय प्रकार आहे? हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. American Acadamy Of Opthalmology च्या मते हा एक संसर्गजन्य आजार आहे. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह व्हायरस, बॅक्टेरिया किंवा ऍलर्जीमुळे होऊ शकतो. जिवाणू आणि विषाणूजन्य डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहजपणे पसरतो. दरम्यान ऍलर्जीक पद्धतीने हा आजार झाल्यास त्याचा इतरांना संसर्ग होत नाही.
“व्हायरल पद्धतीने होणारा हा आजार डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह सर्वात सामान्य प्रकार आहे. गुलाबी डोळ्याचा हा प्रकार खूप संसर्गजन्य आहे आणि अनेकदा शाळा आणि इतर गर्दीच्या ठिकाणी पसरतो. यामुळे सामान्यतः जळजळ होणे, डोळे लाल होऊन पाण्यासारखा स्त्राव . व्हायरल नेत्रश्लेष्मलाशोथ सामान्यतः त्याच विषाणूमुळे होतो ज्यामुळे सामान्य सर्दी असलेल्या लोकांमध्ये नाक वाहते आणि घसा खवखवतो.” अशी माहिती आम्हाला वाचायला मिळाली.

या आजरात डोळ्यांचा दाह होण्याबरोबरच डोळ्यांना खाज पडणे, डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे होणे आदी लक्षणे आढळतात. अशी माहिती आम्हाला मिळाली.
या आजाराचा प्रसार सध्या जोरात सुरु आहे. विशेषतः देशभरात आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केल्यास असंख्य रुग्ण आढळून येत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने ३ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आजाराचा प्रसार मोठा आहे.

” महाराष्ट्रात जुलै महिन्यात डोळे येण्याच्या आजाराचे साधारणपणे ८७००० रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्राच्या इतर भागांबरोबरच मुंबईत प्रसार वाढत आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव आदी १२ जिल्ह्यात रुग्णांची संख्या अधिक असल्याची” माहिती आम्हाला वाचायला मिळाली.
दैनिक प्रभात ने २ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात एक लाखाहून अधिक जणांचे डोळे आल्याचे म्हटले असून याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आपल्या @TanajiSawant4MH या ट्विटर खात्यावरून नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
या आजाराने सोशल मीडिया मात्र व्यापला गेला आहे. विविध औषधे घेण्याची सूचना करणारे पोस्ट आणि उपहासात्मक पोस्ट केल्या जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
एका व्हाट्सअप मेसेजच्या माध्यमातून डोळ्यात हे औषध टाकल्यास डोळे आले तर बरे होतील असा दावा करण्यात आला. कोणीही निंबोळी ट्यूब वापरू नये असे आवाहन करण्यात आले.

आजारातही विनोद करणारे अनेक पोस्टर्स लक्ष वेधून घेणारे ठरले.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील गॉगल घातलेल्या अभिनेत्रींचा फोटो वापरून काही उपहासात्मक पोस्टही पाहायला मिळाल्या.


साथीचा आजार आणि औषधांच्याबद्दल पसरणारे मेसेज याबद्दल आम्ही प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रसाद जिरगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ” हा आजार संसर्गजन्य असून संपर्क आणि गर्दीच्या ठिकाणी एकत्रित येण्याने हा आजार पसरतो.” अशी माहिती त्यांनी दिली. “आजाराचा प्रकार अभ्यासून त्यावर टप्प्याटप्प्याने औषधे द्यावी लागतात. यामुळे सेल्फ किंवा सोशल मीडियावर उपलब्ध होणाऱ्या मेडिकेशन पेक्षा आपण नेत्रतज्ञांना भेटून औषधे घेणे गरजेचे आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.
रुग्णांसाठी मार्गदर्शक माहिती त्यांनी न्यूजचेकरला उपलब्ध केली.

डॉक्टरांच्या मते सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळणे, डोळ्याची जळजळ आणि इतर लक्षणे दिसल्यास थेट Opthalmologist अर्थात नेत्रतज्ञाशी संपर्क साधणे, स्टिरॉइड्स प्रकारच्या औषधांचा वापर न करणे, डोळे चोळणे, कॉन्टॅक्ट लेन्सिस वापरणे आणि पोहणे टाळणे, स्वतःला आयसोलेट करणे आदी काळजी घेण्याची गरज आहे.
अशाप्रकारे या संसर्गजन्य आजारात गर्दीच्या ठिकाणी न जात काळजी घेणे आणि आजार झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे. हाच एकमेव मार्ग असल्याचे आम्हाला दिसून आले आहे.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in