पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकाम्या मैदानाला अभिवादन केले असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात नरेंद्र मोदी हेलिकाॅप्टरजवळ मैदानात उभे राहून हातवारे करत आहेत मात्र पुढे कुठेही माणसांची गर्दी दिसत नाही. पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्याशिवाय तिथे एक ही माणूस दिसत नाही.
आमच्या एका वाचकाने हा व्हिडिओ आमच्याकडे पडताळणीसाठी पाठविला असून याची सत्यता तपासण्यास सांगितले आहे. आम्हाला याच दाव्याने हा व्हिडओ ट्विटर आणि फेसबुकवर देखील व्हायरल होत असल्याचे आढळून आले. पोस्टमध्ये म्हटले आहे की, जवळपास कोणी स्टाफ व्यतिरिक्त माणूस आहे का हात हलवतयं ते आभाळ हेपले. यावरुन हेच स्पष्ट होत आहे की पंतप्रधान मोदींवर व्हायरल व्हिडिओवरुन टीका केली जात आहे.

Fact Check/Verification
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंच रिकाम्या मैदानाला अभिवादन केेले का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी व्हायरल व्हिडिओतील काही किफ्रेम्स गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला मूळ व्हिडिओ 1 एप्रिल रोजी भाजपच्या हँडलवरून शेअर करण्यात आला असे आढळून आले. पश्चिम बंगालच्या जयनगरमधील रैली दरम्यानचा आहे.या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की वरील व्हिडिओमध्ये दिसते की, मोदी जेव्हा हेलिकॉप्टरमधून उतरले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली होती. मोदींनीसुद्धा हात हलवून लोकांना अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जयनगरमधील त्यांच्या सभेला हजर असलेल्या हजारो लोकांना मैदानातून तसेच कारमध्ये उभे राहून अभिवादन करत आहेत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
याशिवाय टाईम्स आॅफ इंडियाच्या युट्यूब चॅनलवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयनगर येथील रैलीचा हा व्हायरल व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात देखील हजारो लोक मैदानात उतरुन मोदींना हातवारे करुन अभिवादन करत आहेत तर मोदी देखील त्यांना मैदानात तसेच चालत्या कारमध्ये उभे राहून अभिवादन करत असल्याचे दिसत आहे.
यावरुन हे स्पष्ट होते की, मूळ व्हिडिओ ब्लर करुन हिंदी गाण्याचे म्यूझिक लावून पंतप्रधान मोदी केवळ रिकाम्या मैदानाला अभिवादन करत असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायरल पोस्ट द्वारे करण्यात आला आहे.
Conclusion
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमधील जयनगर येथील रॅली दरम्यानचा व्हिडिओ ब्लर करुन चुकीच्या दाव्याने व्हायरल करण्यात आला आहे.
Result: Manipulated Media
Our Sources
भाजपा – https://twitter.com/BJP4India/status/1377582817291329539
टाईम्स आॅफ इंडिया – https://www.youtube.com/watch?v=lhn7S9157xc
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.