Thursday, December 19, 2024
Thursday, December 19, 2024

HomeFact Checkबॅंकेवर दिवसाढवळ्या दरोडा टाकणा-या दरोडेखोरांना पोलिसांनी पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल, हे आहे सत्य

बॅंकेवर दिवसाढवळ्या दरोडा टाकणा-या दरोडेखोरांना पोलिसांनी पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

बॅंकेवर दिवसाढवळ्या दरोडा टाकणा-या दरोडेखोरांना अहमदनगर एमआयडीसी पोलिसांनी पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॅंकेचे शटर उचलून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणा-या दोन दरोडेखोरांना पोलिस शिताफीने पकडतात व एका दरोडेखोराच्या हाततील पिस्तूल देखील हिसकवतात.दरोडेखोरांना पकडण्याचा थरार तेथे जमलेले शेकडो लोक आपल्या मोबाईल कॅमे-यात कैद करताना, तर काही लोक पोलिसांनी पकडलेल्या या दरोडेखोरांना मारण्यासाठी सरसावल्याचे देखील यात दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बँकेत दरोडा टाकणारे दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात, एमआयडीसी पोलीस स्टेशन अहमदनगर पोलिसांची कामगिरी” फेसबुकवर देखील हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात याच दाव्याने शेअर होत आहे.

Fact Check/Verification

बॅंकेवर दिवसाढवळ्या दरोडा टाकणा-या दरोडेखोरांना अहमदनगर एमआयडीसी पोलिसांनी खरंच पकडले आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मुख्य प्रवाहातील माध्यमांत ही बातमी आढळून आली नाही. किवर्ड्स आणि इमेज रिव्हर्सच्या साहाय्याने शोध घेतला असता युट्यूबवर vision News Nashik News युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ व्हायरल दाव्यानिशी पब्लिश करण्यात आला असल्याचे आढळून आले.

अधिक शोध घेतला असता महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर 1 सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेली बातमी आढळून ज्यात व्हायरल व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. बातमीत म्हटले आहे की, नगर तालुक्यातील शेंडी गावात ग्रामसुरक्षा दलाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. जिल्हा पोलिस दलातर्फे ठिकठिकाणी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून अपत्तीच्या वेळी ग्रामस्थांना पोलिसांची तातडीनं मदत मिळण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रात्यक्षिक सादर करत पोलिसांसह गावातील शकडो ग्रामस्थांना संदेश देण्यात आला.

सामनाच्या वेबसाईटवर देखील या माॅक ड्रिलची बातमी प्रसिद्ध झाली आहे. शेंडी गावात ग्रामसुरक्षेच्या दृष्टीने हे प्रात्यक्षिक पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून हे प्रात्यक्षिक पोलिसांनी केल्याचे या बातमीत म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही अहमदनगर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “1 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी शेंडी गावात हे माॅक ड्रिल करण्यात आले.पोलिस प्रशासनाकडून गावांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. गावांतील प्रत्येक घरातील एका सदस्याचा मोबाईल नंबर या यंत्रणेशी जोडण्यात आला आहे. कोणत्याही संकटाच्यावेळी टोल फ्री नंबर डायल केला तर या सर्व सदस्याच्या मोबाईलवर काॅल जातो, त्यामुळे सर्वांना संकटाबाबत तत्काळ माहिती मिळते. बॅंकेतील दरोडेखोरांना पकडण्याचे माॅक ड्रिल सुरु असताना एकाच वेळी पाचशे जणांना काॅल केला गेला त्यामुळे पाचच मिनिटात तिथे पाचशेपेक्षा जास्त लोक जमा झाले.”

Conclusion 

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, अहमदनगर पोलिसांनी बॅंकेवर दरोडा टाकणा-या तीन दरोडेखोरांना पकडलेले नाही तर ग्राम सुरक्षेच्या दृष्टीने माॅक ड्रिल केले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.

Result- Misleading

Our Source

सामना- https://www.saamana.com/ahmednagar-shendi-bank-theft-mock-drill/

अहमदनगर पोलिस – https://ahmednagardistpolice.gov.in/#


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा





Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular