Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो.
Fact
संबंधित फोटो AI जनरेटेड असल्याचे आढळले आहे.
अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधला फोटो असे सांगत सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की गौरीने लग्नाच्या 33 वर्षांनंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे. न्यूजचेकरला हा फोटो जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केला असल्याचे आढळले.
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
गौरी खानने इस्लाम स्वीकारला की नाही हे शोधण्यासाठी आम्ही एक कीवर्ड शोधला. तथापि, गौरीने इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे सांगणारे कोणतेही वृत्त आम्हाला आढळले नाही. आम्हाला 8 ऑक्टोबर, 2024 रोजीचा टाईम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट सापडला, “गौरी कॉफ़ी विथ करणमध्ये दिसली जेव्हा तिने लग्नानंतर तिच्या धार्मिक ओळखीबद्दल उघड भाष्य केले आणि म्हणाली, “मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ असा नाही की मी धर्मांतर करून मुस्लिम बनेन. माझा त्यावर विश्वास नाही. प्रत्येकजण एक व्यक्ती आहे आणि आपल्या धर्माचे पालन करतो. अर्थात, परस्पर आदर असला पाहिजे. शाहरुख कधीही माझ्या धर्माचा अनादर करणार नाही आणि मी त्याच्या धर्माचा अनादर करणार नाही.” तत्सम रिपोर्ट पाहता येईल.
8 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या एका न्यूज 18 रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की कॉफी विथ करणच्या पहिल्या सीझनमध्ये करण जोहरसोबत झालेल्या संभाषणात गौरी खान म्हणते की तिला शाहरुख खानच्या धर्माबद्दल खूप आदर आहे, परंतु ती कधीही इस्लाम स्वीकारणार नाही. गौरी धर्माने हिंदू आहेत.
त्यानंतर आम्ही AI चा वापर झाला आहे का हे पाहण्यासाठी फोटोचा तपास अनेक AI-सामग्री शोध प्लॅटफॉर्मवर चालवला.
ट्रूमीडियाला मक्केतील शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या व्हायरल प्रतिमेमध्ये “फेरफार करण्याचे ठोस पुरावे” सापडले.
दुसऱ्या AI-इमेज डिटेक्टर Hive Moderation ने 99.9% शक्यता दाखवली की इमेजमध्ये AI-व्युत्पन्न किंवा डीपफेक सामग्री आहे.
दुसरे टूल, फेक इमेज डिटेक्टरने देखील पुष्टी केली की प्रतिमा “संगणकाने व्युत्पन्न किंवा मॉडिफाइड केली” आहे.
शाहरुख खान आणि गौरी खानचा मक्कामधील फोटो असे सांगत व्हायरल चित्र AI व्युत्पन्न असल्याचे आढळून आले.
Sources
News report in Times of India on October 8,2024
News report in News 18 on October 8,2024
TrueMedia Website
Hive Moderation Website
Fake Image Detector tool
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम सबलू थॉमस यांनी केले असून ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
January 11, 2025
Prasad S Prabhu
May 19, 2024
Ishwarachandra B G
May 14, 2024