Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkटाटा समूहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर भारतातून कॅनडाला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटमध्ये भांगडा...

टाटा समूहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर भारतातून कॅनडाला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटमध्ये भांगडा नृत्य सादर करण्यात आले?

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

टाटा ग्रुपने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर भारतातून कॅनडाला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटमध्ये भांगडा करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

8 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र सरकारने सरकारी संसाधनांच्या निर्गुंतवणूक योजनेचा भाग म्हणून एअर इंडिया टाटा समूहाकडे सुपूर्द केली. अमर उजालाच्या वृत्तानुसार, ‘टाटा ग्रुपने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडिया सुरू केली. सन 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय विमान कंपनीची गरज भासू लागली. अशा परिस्थितीत भारत सरकारने एअर इंडियामध्ये 49 टक्के हिस्सा विकत घेतला.

टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यानंतर, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी चांगल्या सेवांच्या आशेने अनेक पोस्ट शेअर केल्या. त्याच क्रमाने, टाटा समूहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर भारतातून कॅनडाला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटमध्ये भांगडा करण्यात आल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.

Fact Check/Verification

टाटा समूहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर भारतातून कॅनडाला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटमध्ये भांगडा सादर करण्यात आल्याचा दावा करून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर व्हिडिओची कीफ्रेम शोधली, परंतु आम्हाला कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही.

व्हायरल व्हिडिओबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी, आम्ही ट्विटरवर ‘भांगडा फ्लाइट’ हा कीवर्ड शोधला, जिथे आम्हाला आउटलुक मॅगझिनने 23 फेब्रुवारी 2018 रोजी शेअर केलेल्या ट्विटमध्ये व्हायरल व्हिडिओ आढळून आला.

आऊटलूक मॅगझिनने आपल्या ट्विटमध्ये व्हिडिओचा स्रोत म्हणून ढोल ब्लास्टर्सचा उल्लेख केला आहे, परंतु आम्ही काही कीवर्डसह शोध घेतला तेव्हा आम्हाला त्या फेसबुक पेजबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

यानंतर, आम्ही Google वर काही कीवर्ड द्वारे शोध घेतला असता, झी न्यूज, इंडिया टुडेसह इतर माध्यमांनी प्रकाशित केलेले रिपोर्ट्स आढळले. हे रिपोर्ट्स 2018 मध्येच प्रकाशित झाले आहेत.

2018 मध्ये, एअर इंडियाने अमृतसर आणि बर्मिंगहॅम दरम्यान नॉन-स्टॉप फ्लाइट सुरू केल्यानंतर फ्लाइटमधील भांगड्याचा व्हिडिओ टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यानंतर भारतातून कॅनडापर्यंतचे पहिले उड्डाण केल्याचा म्हणून शेअर करण्यात येत आहे.

Zee News ने रिपोर्टमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओचा स्त्रोत Dhol Blasters असल्याचे म्हटले आहे, पण एम्बेड केलेला Facebook व्हिडिओ सध्या अनुपलब्ध आहे.

वरील रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीच्या आधारे, Twitter Advanced Search Tool च्या मदतीने केलेल्या शोधात, आम्हाला असे अनेक फोटो आणि व्हिडिओ आढळून आले, जे 2018 मध्ये अमृतसर आणि बर्मिंगहॅम दरम्यान नॉनस्टॉप एअर इंडियाची फ्लाईट सुरु झाल्यानंतर फ्लाइटमध्ये भांगडा केल्याचे आहेत.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की एअर इंडियाने 2018 मध्ये अमृतसर आणि बर्मिंगहॅम दरम्यान नाॅनस्टाॅ फ्लाईट सुरू केल्यानंतरचां फ्लाईटमधील भांगडाचा व्हिडिओ, टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यानंतर भारत ते कॅनडा पहिल्या फ्लाइटमध्ये भांगडा करतानाचा व्हिडिओ म्हणून शेअर केला आहे. .

Result: Misleading

Our Sources

Zee News

Outlook Magazine


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular