Saturday, November 2, 2024
Saturday, November 2, 2024

HomeFact CheckFact Check: मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची डीपफेक जाहिरात व्हायरल

Fact Check: मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची डीपफेक जाहिरात व्हायरल

Authors

Kushel HM is a mechanical engineer-turned-journalist, who loves all things football, tennis and films. He was with the news desk at the Hindustan Times, Mumbai, before joining Newschecker.

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
तुम्ही सट्टेबाजीद्वारे सहज पैसे कमवू शकता असे सांगणारी जाहिरात, कथितपणे बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला एका मोबाइल गेम ॲपची जाहिरात करत असल्याचे दर्शवित आहे.

Fact
अक्षय कुमारने असे समर्थन केलेले नाही, व्हायरल जाहिरात डीपफेक असल्याचे आढळले.

मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची जाहिरात व्हायरल झाली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स एक क्लिप प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये कथितपणे बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार मोबाईल गेम ॲप, एव्हिएटरचे समर्थन करताना दिसत आहे, जे सट्टेबाजीद्वारे सहज पैसे देण्याचे वचन देते. ट्विटच्या संग्रहित आवृत्त्या येथे आणि येथे पाहता येतील.

Fact Check: मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची डीपफेक जाहिरात व्हायरल

Fact Check

न्यूजचेकरने प्रथम “Akshay Kumar aviator” साठी कीवर्ड शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला अनेक बातम्यांचे रिपोर्ट सापडले, ज्यामध्ये व्हायरल जाहिरात शेयर केली होती, अभिनेत्याने गेमिंग ऍप्लिकेशन, एव्हिएटरची जाहिरात करतानाचा डीपफेक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. बातमीनुसार, 56 वर्षीय अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की तो “खूप नाराज” आहे आणि सर्व उपलब्ध कायदेशीर पर्यायांसह या समस्येला सामोरे जाण्यासाठी त्याने आपल्या टीमला सूचित केले आहे.

सोशल मीडिया हँडल आणि कंपनीविरुद्ध बनावट व्हिडिओ तयार करून त्याचा प्रचार केल्याबद्दल सायबर तक्रार दाखल करण्यात आली आहे, यासंदर्भातील बातम्या येथे, येथे आणि येथे पाहिल्या जाऊ शकतात.

त्यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेम्सचा रिव्हर्स इमेज सर्च केला, ज्यामुळे आम्हाला अक्षय कुमारने 9 ऑगस्ट 2023 रोजी त्याच्या OMG 2 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अपलोड केलेल्या या Instagram रीलकडे नेले.

Fact Check: मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची डीपफेक जाहिरात व्हायरल

व्हायरल व्हिडिओची (डावीकडे) इंस्टाग्राम रीलच्या क्रॉप केलेल्या स्क्रीनग्राब्स (उजवीकडे) सोबत केलेली तुलना सूचित करते की, विशेषत: अक्षय कुमारचा टी-शर्ट, केशरचना आणि पार्श्वभूमी लक्षात घेता त्यात अल्टर करण्यात आला आहे.

Fact Check: मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची डीपफेक जाहिरात व्हायरल
Fact Check: मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची डीपफेक जाहिरात व्हायरल

आम्ही डीपवेअर, समुदाय-चालित ओपन-सोर्स डीपफेक डिटेक्शन टूलवर व्हिडिओ चालवला, तेथे या व्हिडिओला “संशयास्पद” शेरा दिला असून पुढे व्हायरल व्हिडिओ डीपफेक असल्याची पुष्टी केली आहे.

Fact Check: मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची डीपफेक जाहिरात व्हायरल

मागच्या महिन्यात, न्यूजचेकरने अशाच अनेक डीपफेक जाहिरातींना डिबंक केले होते, ज्यात शाहरुख खान, कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांना दाखवून सहज पैसे मिळवून देणाऱ्या एका ऑनलाइन गेमचा प्रचार करण्याचा प्रयत्न झाला होता.

Conclusion

अक्षय कुमार ऑनलाइन गेमची जाहिरात करत असल्याचे दाखवणारी व्हायरल जाहिरात ही डीपफेक आहे.

Result: Altered Media

Sources
Times of India report, February 3, 2024
Instagram reel, Akshay Kumar, August 9, 2023
Deepware tool

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular