Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
अमित शाह म्हणाले की, सर्व पक्षांच्या सोशल मीडिया कार्यकर्त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या 5 किलो राशनवर चालतो.
नाही, व्हायरल ग्राफिक्स एडिटेड आहे.
सोशल मीडियावर अमित शाह यांचे एक कथित विधान व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जातो की त्यांनी म्हटलं आहे की सर्व पक्षांच्या सोशल मीडिया कार्यकर्त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या 5 किलो राशनवरच चालतो.
मात्र, आमच्या तपासात आढळले की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पटणामध्ये आयोजित NDTV PowerPlay च्या कार्यक्रमात असे कोणतेही विधान केलेले नाही. NDTV ने देखील याचे खंडन केले आहे.
सोशल मीडियावर अमित शाह यांच्या कथित विधानाला एका ग्राफिक्सच्या माध्यमातून शेअर केले जात आहे. ज्यामध्ये वर NDTV Indian Power Play चे लोगो आहे. खाली बिहार विधानसभा निवडणूक 2025 असे लिहिले आहे. त्यानंतर असे विधान दिले आहे “सोशल मीडिया वर जे लोक कार्यकर्ते आहेत कोणत्याही पक्षाचे असोत ते आमच्या 5 किलो राशनवरच जगत आहेत.” खाली अमित शाह यांचा NDTV चा माईक हातात धरलेला फोटो आहे.
हे ग्राफिक्स खरे मानून अनेक X अकाउंट्सवरून शेअर करण्यात आले आहे. ते येथे, येथे आणि येथे पाहू शकता.

तसेच हे ग्राफिक्स फेसबुकवरही व्हायरल होत आहे.

अमित शाह यांच्या नावाने व्हायरल या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही कीफ्रेम वापरून रिव्हर्स इमेज सर्च केले. या दरम्यान आम्हाला NDTV इंडिया च्या X अकाउंटवरून 1 नोव्हेंबर 2025 ला पोस्ट केलेला एक थ्रेड सापडला. या थ्रेडमध्ये NDTV PowerPlay कार्यक्रमात अमित शाह यांनी केलेल्या प्रमुख विधानांचे ग्राफिक्स होते.

या ग्राफिक्समध्ये बिहार निवडणूक, राजद, नितीश कुमार, प्रशांत किशोर आणि घुसखोरीसह इतर मुद्द्यांवर अमित शाह यांच्या विधानांचा उल्लेख होता. मात्र व्हायरल ग्राफिक्समध्ये असलेले 5 किलो राशनचे विधान त्यात कुठेही नव्हते.

यानंतर व्हायरल ग्राफिक्सची तुलना मूळ ग्राफिक्सशी केल्यावर अनेक फरक आढळले. जसे की — दोन्हींचे फॉन्ट खूप वेगळे होते. व्हायरल ग्राफिक्समध्ये मजकूराच्या मागे उजळ पट्टी होती, जी मूळ ग्राफिक्समध्ये नाही. तसेच व्हायरल मजकुरात व्याकरणाच्या चुका होत्या, ज्या सहसा मोठ्या न्यूज संस्थांच्या ग्राफिक्समध्ये दिसत नाहीत.

तपासादरम्यान NDTV च्या YouTube चॅनेलवर 1 नोव्हेंबर 2025 ला लाईव्ह झालेले अमित शाह यांचे पूर्ण मुलाखतीचे व्हिडिओ देखील आम्ही पाहिले. या कार्यक्रमात माओवादी, बिहारमधील घुसखोरी, आर्थिक गुन्हे, निवडणूक, राजदचे वायदे, जंगलराज अशा मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र यात त्यांनी व्हायरल दाव्यासारखे कोणतेही विधान केले नाही.

तसेच NDTV च्या वेबसाईटवर 3 नोव्हेंबर 2025 ला प्रकाशित झालेल्या एका बातमीत NDTV ने व्हायरल ग्राफिक्स बनावट असल्याचे लिहिले आहे. रिपोर्टमध्ये लिहिले आहे — “अमित शाह यांच्या नावाने फिरणारे हे ग्राफिक्स डिजिटल स्वरूपात बनावट आहे. गृहमंत्र्यांनी असा कोणताही दावा या कार्यक्रमात केला नव्हता.”

आम्हाला इतर कोणत्याही विश्वसनीय मीडिया रिपोर्टमध्येही असे विधान आढळले नाही.
आमच्या तपासात स्पष्ट झाले की अमित शाह यांनी सोशल मीडिया वरील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांविषयी असे कोणतेही विधान केलेले नाही. व्हायरल ग्राफिक्स एडिटेड आहे. NDTV ने देखील याचे खंडन केले आहे.
Our Sources
X posts published by NDTV India on 1st Nov 2025
Article published by NDTV on 3rd Nov 2025
Self analysis
Prasad S Prabhu
November 22, 2025
JP Tripathi
November 21, 2025
Prasad S Prabhu
October 25, 2025