Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक चित्र सध्या व्हायरल होत आहे.पुण्यात झालेला तुफान पाऊस आणि पूरसदृश्य परिस्थिती त्या दाखवत असून सरकारचे अपयश दाखवून देत असल्याचा दावा करण्यात येत आहे.फेसबुक आणि ट्विटर वर हे चित्र मोठ्याप्रमाणात शेयर केले जात आहे.
या चित्राचा तपास आम्ही घेतला.आम्ही सर्वप्रथम या चित्रातील पाणी साचलेल्या चित्रावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला.पुरस्थितीतले खरे चित्र आम्हाला Puneri Guide ह्या ट्विटर अकाउंटवर १४ ऑक्टोबर रोजी शेअर केल्याचे सापडले.पीआय न्यूजच्या वेबसाइटवरही आम्हाला ही छायाचित्रे सापडली.त्यानंतर आम्ही अमृता फडणवीस ह्यांच्या चित्रावर रिव्हर्स इमेज सर्च केले.अमृता फडणवीस यांनी आपले मूळ खरे चित्र त्यांच्या ट्विटर हॅन्डल वर १६ जुलै २०२१ रोजी पोस्ट केले होते.त्यांनी मुंबई मधील खड्डे असलेले रस्ते आणि पाणी साचलेले रस्ते यासोबत स्वतः फोटोशूट केले होते.त्यासंबंधी आम्हाला एबीपी माझा च्या वेबसाईट वर देखील एक बातमी सापडली.
अमृता फडणवीस यांनी मागील वर्षीच्या पावसात मुंबईत साचलेले पाणी आणि रस्त्यांची खराब परिस्थिती यावर भाष्य केले होते.तेच चित्र वापरून पुण्याच्या पावसाच्या चित्राशी एडिट करून हि पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Our Sources
Tweet shared by PUNERI GUIDE on 14 October,2022
Article published by Pro IQRA News
Tweet made by Amruta Fadnwis on 16 July,2021
जर तुम्हाला ही वस्तुस्थिती तपासणी आवडली असेल आणि अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर, येथे क्लिक करा.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल: checkthis@newschecker.in