Authors
Claim
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
Fact
न्यूजचेकरने व्हिडिओच्या कीफ्रेमचा रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला 1 जुलै 2023 चा Scroll चा रिपोर्ट सापडला. ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओचा समावेश होता. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की निदर्शकांच्या एका गटाने मालदीवमध्ये भारतविरोधी निदर्शने केली ज्यात काहींनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घातले होते, तर काहींनी “इंडिया आउट” असे लिहिलेले बॅनर हातात घेतले होते.
“गुरुवारच्या निषेधाचे तात्काळ स्वरूप स्पष्ट नाही, परंतु मालदीवमधील विरोधी पक्ष सरकारला लक्ष्य करण्यासाठी 2020 पासून “इंडिया आउट” मोहिमेचा वापर करत आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या नेतृत्वाखाली अशा आंदोलनांवर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी, आंदोलकांनी आरोप केला होता की सरकार “नवी दिल्लीचे कठपुतळी” बनले आहे आणि भारताला या बेटावरील देशात लष्करी उपस्थिती ठेवण्यास परवानगी देत आहे,” असे रिपोर्टमध्ये लिहिलेले आहे.
व्हायरल दाव्यातील (डावीकडे) व्हिडिओसह निषेधाच्या (उजवीकडे) स्क्रीनशॉटची तुलना हे समान प्रात्यक्षिक असल्याची पुष्टी करते.
“ईद-अल-अधा निमित्त विरोधकांनी “इंडिया आउट” मोहिमे केल्यानंतर मालदीव सरकारने झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला. मालदीव सरकारने भारताविरुद्धच्या मोहिमेला “अनादर करणारे कृत्य आणि द्वेष भडकवण्याचा प्रयत्न” म्हटले आहे. त्यांनी निदर्शनांदरम्यान नरेंद्र मोदींच्या मास्कच्या वापरावरही टीका केली. विरोधकांना फटकारताना, मालदीव सरकारने सांगितले की ते त्यांच्या “इंडिया फर्स्ट” धोरणावर ठामपणे उभे आहे,” अशी माहिती आम्हाला हिंदुस्तान टाईम्सच्या 1 जुलै 2023 रोजीच्या रिपोर्टमध्ये समजली. तत्सम अहवाल येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात, यावरून व्हायरल व्हिडिओ जुन्या निषेधाचा असल्याची पुष्टी मिळते.
Result: Missing Context
Sources
Scroll report, July 1, 2023
Hindustan Times report, July 1, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा