Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
भारतीय नागरिक आता 9851145045 या हॉटलाइन नंबरवरून थेट भारताच्या पंतप्रधान कार्यालयाला (PMO) भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवू शकतात.
हा दावा खोटा आहे. 9851145045 हा नंबर भारताच्या पंतप्रधान कार्यालयाशी (Indian PMO) संबंधित नाही, तर तो नेपाळच्या पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कार्यालयाशी (OPMCM) संबंधित आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्स असा दावा करत आहेत की नागरिक आता “सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचार, विलंब किंवा गैरव्यवहार याबाबत थेट भारतीय PMO ला हॉटलाइनवर 9851145045 या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात.”
मात्र Newschecker ने या दाव्याची सखोल पडताळणी केली आणि तो दावा चुकीचा असल्याचं आढळलं.

गूगलवर “9851145045”, “Indian government” आणि “PMO helpline” या कीवर्डसह शोध घेतल्यावर, भारताच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) अशा कोणत्याही हॉटलाइन सेवेबाबत अधिकृत निवेदन, प्रसिद्धिपत्रक किंवा विश्वसनीय माध्यमांतील बातमी प्रसिद्ध केल्याचं आढळलं नाही.
मात्र, नेपाळस्थित Republica या वृत्तसंस्थेने २० सप्टेंबर २०२५ रोजी प्रकाशित केलेल्या अहवालात नमूद केलं आहे की, सरकारी सेवांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी नेपाळच्या पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कार्यालयाने (OPMCM) नागरिकांसाठी एक विशेष हेल्पलाइन सुरू केली आहे, ज्याद्वारे ते सरकारी सेवांबाबत तक्रारी नोंदवू शकतात. हा क्रमांक — 9851145045 — शनिवारी प्रसिद्ध झालेल्या सार्वजनिक सूचनेद्वारे जाहीर करण्यात आला.

प्रत्यक्षात, हा नंबर नेपाळ सरकारने सुरू केलेल्या ‘हॅलो गव्हर्नमेंट’ उपक्रमाचा भाग आहे.
नेपालातील Republica वृत्तसंस्थेने या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
तसंच Nepal Telecom नेही पुष्टी केली आहे की हा एक पोस्टपेड सेवा क्रमांक आहे.
हा क्रमांक OPMCM च्या अधिकृत संकेतस्थळावरील “Hello Government” विभागात स्पष्टपणे दिला आहे, ज्याद्वारे नागरिक शासन व्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी आपल्या तक्रारी आणि सूचना शेअर करू शकतात.

“भारतीय PMO ने भ्रष्टाचारासाठी 9851145045 हॉटलाइन सुरू केली आहे” — हा दावा पूर्णपणे खोटा आहे. हा नंबर भारत सरकारशी संबंधित नाही, तो नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाशी (Office of the Prime Minister and Council of Ministers – OPMCM) संबंधित आहे.
प्र.1. 9851145045 हा नंबर भारतीय PMO ला भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आहे का?
नाही. हा नंबर भारताच्या पंतप्रधान कार्यालयाशी (PMO) कोणत्याही प्रकारे संबंधित नाही.
प्र.2. 9851145045 ही हॉटलाइन कोणी सुरू केली?
ही हेल्पलाइन नेपाळच्या पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कार्यालयाने (Office of the Prime Minister and Council of Ministers – OPMCM) सुरू केली आहे.
प्र.3. आम्हाला हा नंबर नेपाळचा असल्याचं कसं समजलं?
“9851145045” या कीवर्डचा वापर करून केलेल्या शोधात अनेक नेपाळस्थित वृत्तसंस्था आणि नेपाळच्या OPMCM च्या अधिकृत संकेतस्थळावर याच क्रमांकाचा उल्लेख आढळला. भारतीय सरकारकडून किंवा कोणत्याही विश्वासार्ह भारतीय माध्यमातून या क्रमांकाचा उल्लेख आढळलेला नाही.
Sources
Report By Republica, Dated September 20, 2025
Report By Nepali Telecom, Dated September 20, 2025
Official Website Of Nepal’s OPMCM