Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
सोशल मीडियात भुशी डॅमचा व्हिडिओ असल्याचा दावा व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोणावळ्यातील भुशी डॅमवर रविवारी गर्दी झाली होती. भारत कधीच कोरोनाला रोखू शकत नाही.
व्हायरल व्हिडिओत डॅमवर पाय-यांवरुन पडणा-या पाण्यात भिजण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याची दिसत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केल्यावर लोक तिथून पळून जात आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा व्हिडिओ लोणावळ्यातील भुशी डॅमचा असून लोक असेच वागत राहिले तर भारतातून कोरोना जाणार नाही.
Fact Check / Verification
सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ लोणावळा येथील भुशी डॅमचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता फेसबुकवर याच दाव्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.
आम्ही व्हायरल व्हिडिओतील काही स्क्रिनशाॅट काढून घेतले व रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध सुरु केला असता यूट्यूबर GHUMO RAJASTHAN या चॅनलवर व्हायरल व्हिडिओशी साम्य असणारा एक व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की, भिलवाडापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेला हा गोवटी तलाव आहे.
गोवटा तलाव भरुन वाहू लागल्याने लोकांनी लाॅकडाऊनमध्ये सुद्धा गर्दी केल्याचे वृत्त News 18 या वृत्तवाहिनीने दिले आहे.
याशिवाय गोवटा तलावात पोलीस पोहचल्याचा व्हायरल व्हिडिओ देखील यूट्यूबवर आढळून आला. यात म्हटले आहे की लाॅकडाऊनमध्ये लोकांनी तलावात गर्दी करणा-या लोकांवर लाठीचार्ज केला.
दैनिक भास्करने देखील लाॅकडाऊन असतान गोवटा तलावापाशी लोकांची गर्दी झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची बातमी प्रसिद्ध केली आहे.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ हा लोणावळ्यातील भुशी डॅमचा नसून राजस्थानमधील गोवटा तलावाचा आहे. सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ इतर शहरांच्या नावाने देखील व्हायरल होत आहे.
Result- Misleading
Sources
दैनिक भास्कर- https://www.bhaskar.com/local/rajasthan/bhilwara/news/govata-spill-then-crowd-how-many-people-reached-lockdown-127645972.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.