Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
प्रेयसीचा फोन व्यस्त होता म्हणून प्रियकराने रागात गावाची वीज कापली.
हा आसाममध्ये वीज दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ आहे.
प्रेयसीचा फोन व्यस्त होता म्हणून प्रियकराने रागात गावाची वीज कापली असा दावा करीत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हा दावा पाहायला मिळाला.

अनेक युजर्स व्हाट्सअपवर हा दावा शेयर करीत आहेत.
व्हिडिओत एक युवक एका विजेच्या खांबावर चढला आहे. आपल्या हातातील मोठ्या कटरने तो खांबावरील वीज जोडण्या कापत असताना दिसते.
याप्रकारच्या दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.
न्यूजचेकरच्या तपासात आम्हाला हा दावा खोटा आढळला.
व्हायरल दाव्यात सदर युवक कुठला आणि त्याने कोणत्या गावची वीज कापली याचा उल्लेख आम्हाला आढळला नाही. आम्ही गुगलवर संबंधित कीवर्ड शोधून पाहिले. मात्र अशा घटनेची एकही बातमी आम्हाला आढळली नाही.
दरम्यान आम्ही व्हायरल व्हिडिओच्या काही किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला @Technicalwork786 या युट्युब चॅनेलने हाच व्हिडीओ शॉर्ट्स स्वरूपात १७ जुलै २०२५ रोजी अपलोड केला असल्याचे निदर्शनास आले.

technician, ElectricalSafety, electrician अशाप्रकारचे हॅशटॅग वापरून हा व्हिडीओ घालण्यात आला होता. आम्ही चॅनेलचे बारकाईने निरीक्षण केले. चॅनेलने अशाप्रकारचे इलेक्ट्रिकल काम करतानाचे असंख्य व्हिडीओ घातले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

दरम्यान आणखी पाहणी केली असता व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचा समावेश इतर अनेक व्हिडिओत असल्याचेही आम्हाला दिसून आले.





अधिक शोध घेताना आम्हाला या YouTube अकाउंटशी लिंक केलेले एक फेसबुक पेज देखील सापडले.
Technical Work नावाच्या फेसबुक अकाउंटवर, आम्हाला १७ जुलै २०२५ रोजी अपलोड केलेला व्हायरल व्हिडिओशी साम्य दर्शविणारा व्हिडीओ आढळला. येथे देखील आम्हाला इलेक्ट्रिकल कामाशी संबंधित अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आढळले.

यानंतर, आम्ही हे फेसबुक पेज आणि YouTube अकाउंट चालवणाऱ्या जाहिदुलशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला व्हायरल व्हिडिओची संपूर्ण सत्यता सांगितली. त्यांनी सांगितले की, “व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव अन्वर आहे आणि तो माझ्या टीमचा सदस्य आहे. आम्ही सर्वजण वीज किंवा दुरुस्तीशी संबंधित काम करतो. आम्ही आसाममधील बारपेटाचे रहिवासी आहोत परंतु आम्ही बक्सा जिल्ह्यात काम करताना हा व्हिडिओ बनवला आहे”.
त्यांनी पुढे सांगितले की ते काम करताना व्हिडिओ बनवतात आणि ते त्यांच्या फेसबुक, यूट्यूब आणि सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करतात. यावेळी त्यांनी असेही म्हटले की व्हिडिओसोबत केला जात असलेला व्हायरल दावा पूर्णपणे खोटा आहे आणि ते लोक फक्त वीज दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी त्यांनी आम्हाला त्यांच्या टीमचा फोटो देखील पाठवला, ज्यामध्ये अन्वर देखील दिसतो.

यानंतर, आम्ही जाहिदुलच्या मदतीने अन्वरशी संपर्क साधला, त्यानेही व्हायरल दाव्याचे खंडन केले आणि स्पष्टपणे सांगितले की तो फक्त बक्सा जिल्ह्यात वीज खांबावर दुरुस्ती करत होता.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून, हे स्पष्ट होते की प्रियकराने तिच्या प्रेयसीवर रागावल्यानंतर तिच्या गावात वीज तोडल्याचा हा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा आहे. खरं तर, हा आसाममध्ये वीज दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ आहे.
Our Sources
Technicalwork786 YouTube channel
Technicalwork Facebook page
Telephonic conversation with Jahidul Islam
Telephonic conversation with Anvar Husain
Prasad S Prabhu
September 6, 2025
Prasad S Prabhu
January 7, 2023
Prasad S Prabhu
January 3, 2023